Constitution Amendment : गेल्या 12 वर्षांत आठ घटना दुरुस्त्या, सरकारची संसदेत माहिती

नवी दिल्ली : गेल्या बारा वर्षांत भारताच्या राज्यघटनेत आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही दिली. (Constitution Amendment)

अधिनियमित करण्यात आलेल्या संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांचा तपशील पुढीलप्रमाणे :

1. भारताच्या राज्यघटनेची (99 वी दुरुस्ती) अधिनियम, 2014 (सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी विद्यमान कोलेजियम प्रणालीच्या जागी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यासंबंधी.

2. भारताच्या राज्यघटनेची (100 वी दुरुस्ती) अधिनियम, 2015 (भारत आणि बांगलादेश यांच्यातील भू-सीमा कराराशी संबंधित. (Indian Constitution,)

3. भारताच्या राज्यघटनेची (101 वी दुरुस्ती) अधिनियम, 2016 (देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) शी संबंधित).

4. भारताच्या राज्यघटनेची (102 वी दुरुस्ती) अधिनियम, 2018 (राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यास संबंधित). (Parliament News)

5. भारताच्या राज्यघटनेची (103 वी दुरुस्ती) अधिनियम, 2019 (सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाशी संबंधित).

6. भारताच्या राज्यघटनेची (104 वी दुरुस्ती) अधिनियम, 2019 (लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागांचे आरक्षण आणखी दहा वर्षांसाठी, म्हणजेच 25 जानेवारी, 2030 पर्यंत वाढविण्यास संबंधित). (Rajya Sabha)

7. भारताच्या राज्यघटनेची (105 वी दुरुस्ती) अधिनियम, 2021 (राज्यघटनेच्या अनुच्छेद 342A मध्ये दुरुस्ती तसेच त्यानुषंगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 338B आणि 366 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्यांशी संबंधित).

8. भारतीय राज्यघटनेची (106 वी दुरुस्ती) अधिनियम, 2023 (लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी जागांचे आरक्षण करण्यास संबंधित). (Parliament Session)

 

 
Comments
Add Comment

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून

Independence Day 2026 : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी फडकवणार तिरंगा; स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली हाय अलर्टवर, वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी