NEET पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा दणका! NTA मधील बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी, मोठी भरती जाहीर!

नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या तीव्र वादानंतर केंद्र सरकारने आता 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (National Testing Agency) मध्ये आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी विरोधक आणि विद्यार्थ्यांकडून जंतर-मंतरवर तीव्र आंदोलने केली जात असून, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार संसदेत अत्यंत कडक कायदा आणण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, या घोटाळ्यात संशयित ठरलेल्या NTA मधील काही बड्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या कारवाईनंतर NTA मधील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने नव्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.



तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार नवी भरती



शिक्षण मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या NTA कडून ४ 'जनरल मॅनेजर' (महाव्यवस्थापक) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात काढण्यात आली आहे. यासोबतच, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 'प्रतिभा सेतू' पोर्टलद्वारे १६ 'यंग प्रोफेशनल्स' पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया प्रा. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार राबवली जात आहे. परीक्षा प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि संपूर्ण NTA च्या संरचनेत सुधारणा करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.



अशी असेल पदांची रचना आणि जबाबदारी




NTA मधील महाव्यवस्थापकांच्या चारही पदांवर सुरुवातीला तीन वर्षांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. हे नव नियुक्त अधिकारी प्रश्नपत्रिकांची निर्मिती, परीक्षांचे गुणदान पद्धत, नॉर्मलायझेशन (Normalization), इक्वेटिंग आणि कॅलिब्रेशन यांसारख्या तांत्रिक व गोपनीय प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवतील. देशातील ५०० हून अधिक शहरांमध्ये आणि निवडक आंतरराष्ट्रीय केंद्रांवर होणाऱ्या परीक्षांमध्ये कोणताही गैरव्यवहार किंवा पेपरफुटी होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल.



संशोधन आणि प्रशासनासाठी विशेष पदे


याशिवाय, UPSC पोर्टलवरून भरल्या जाणाऱ्या १६ Young Professionals च्या पदांपैकी १२ पदे ही शैक्षणिक संशोधनासाठी (Academic Research), २ पदे कायदेशीर बाबींच्या तपासासाठी (Legal Research) आणि २ पदे वित्त व लेखा विभागासाठी (Finance & Accounts) राखीव ठेवण्यात आली आहेत. निवड झालेल्या सर्व उमेदवारांची नियुक्ती पुढील २४ महिन्यांच्या कालावधीत केली जाणार आहे. NEET घोटाळ्यानंतर परीक्षा यंत्रणेवरील गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारकडून ही धडक पावले उचलली जात आहेत.

Comments
Add Comment

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून

Independence Day 2026 : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी फडकवणार तिरंगा; स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली हाय अलर्टवर, वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी