उत्तर प्रदेश : मुझफ्फरनगरमधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या १० वर्षाच्या मुलीने दिनांक १० जुलै रोजी तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. शाळेतील शिक्षकांनी मारहाण तसेच १० रुपये चोरल्याचा आरोप करून सर्वांसमोर अपमानित केले यानंतर काही तासांतच तिने टोकाचे पाऊल उचलले.मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी रात्री दोन सरकारी शाळेतील शिक्षकांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
आयुषी ही मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पचेंडा कलान येथील शासकीय प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होती, तिच्या कुस्तीच्या खेळामुळे ती स्थानिक पातळीवर चर्चेत होती. पैलवान बनण्याचे स्वप्न पाहणारी आयुषी आखाड्यात नियमितपणे सराव करत असे.
तक्रारीनुसार, शाळेतील शिक्षिका (Teacher)सविता यांनी आयुषीवर त्यांच्या पर्समधून (Purse) १० रुपये चोरल्याचा आरोप केला. घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी दुपारी १२ च्या सुमारास आयुषीचे वडील अशोक राजपूत यांना फोन करून कळवण्यात आले परंतु, ते काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी शिक्षकांना आपल्या मुलीला समजावून घरी पाठवण्याची विनंती केली.पण त्याऐवजी, शिक्षिका सविताने ही बाब राजीव नावाच्या दुसऱ्या शिक्षकाला सांगितली आणि त्यांनी वर्गातच त्या विद्यार्थिनीला मारहाण केली आणि तिच्या वर्गमित्रांसमोर तिचा अपमान करण्यात आला.
Dhule crime : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील डांग शिरवाडे येथील ...
एका खोट्या आरोपावरून तिला मारहाण झाली नसती आणि सार्वजनिकरित्या अपमानित केले नसते, तर माझी मुलगी आज जिवंत असती, असे म्हणत राजपूत यांनी शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी शिक्षक सविता आणि राजीव यांच्या विरोधात बीएनएस कलम १०७ (मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.





