Nashik : नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली करत विविध ठिकाणी कारवाई करत लाखो रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. मालेगावच्या चंदनपुरी शिवारातील मेसर्स श्रीराम एंटरप्रायझेस येथून सुमारे १७ लाख २७ हजार रुपये किमतीचे सैल रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. तेलाचा दर्जा संशयास्पद असून रिपॅकर/उत्पादन परवाना, विक्री बिल नसणे व भेसळीचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिक भड व चेतन परदेशी यांनी कारवाई केली.
उत्तर प्रदेश : मुझफ्फरनगरमधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या १० वर्षाच्या मुलीने दिनांक १० जुलै रोजी तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. शाळेतील शिक्षकांनी ...
कल्ली कुट्टी, मालेगाव येथील मेसर्स ए-वन ताज बेकरीमधून १ लाख ६० हजार रुपये किमतीचा सुमारे ४०० किलो टोस्ट जप्त करण्यात आला. परवान्याविना व्यवसाय तसेच अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन होत असल्याचे आढळल्याने व्यवसाय बंदची नोटीस बजावण्यात आली. ही कारवाईही अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिक भड व चेतन परदेशी यांनी केली.
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील अंढेरा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांमुळे (Affair) आणि त्यातून निर्माण झालेल्या ...
प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त
आडगाव येथील मेसर्स स्वागतम स्वीट्समधून ५ हजार ७६० रुपये किमतीचे ९ किलो गायीचे तूप जप्त करण्यात आले. तूप निकृष्ट व भेसळयुक्त असल्याचा संशय असून अन्न सुरक्षा अधिकारी संकेत येलमामे व वैभव गर्दे यांनी कारवाई केली.जुने नाशिक येथील मेसर्स भारत जनरल स्टोअरमधून १ लाख १ हजार ७२६ रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करून दुकान सील करण्यात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी जी. एम. गायकवाड, अविनाश दाभाडे, ऋतुजा रावसाहेब नवले व अक्षय खेडकर यांनी केली.याशिवाय, अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनगर, नाशिक येथील ‘सँडी बेकर्स’चा अन्न व्यवसाय परवाना सहाय्यक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांनी निलंबित केला.
Dhule crime : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील डांग शिरवाडे येथील ...
नियमांचे पालन करावे
नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अशा तपासणी व कारवाया यापुढेही तीव्रतेने सुरू राहतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






