Beed Crime : धक्कादायक! डोळ्यात लिंबू पिळून विवाहितेचा छळ; माहेराहून पैसे आणण्यासाठी अमानुष अत्याचार

बीड  : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथे विवाहितेच्या छळाची गंभीर घटना समोर आली आहे. फर्निचर खरेदीसाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत पती आणि सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप एका 36 वर्षीय महिलेने केला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून परळी शहर पोलिसांनी पती, सासू, सासरे, नणंद आणि नणंदेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (Beed News)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह एप्रिल 2023 मध्ये नांदेड येथील युवकासोबत झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही महिन्यांनंतर पतीने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केल्याचा आरोप तिने केला आहे. किरकोळ कारणांवरून मारहाण करणे, घरात कोंडून ठेवणे, अपमानास्पद बोलणे आणि सतत मानसिक दबाव टाकणे, असा त्रास होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Domestic Violence)



महिलेने आपल्या तक्रारीत आणखी गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींचा अंधश्रद्धेवर विश्वास असल्याने तिला अशा प्रकारचे उपचार करणाऱ्या व्यक्तींकडे नेण्यात येत होते. त्यावेळी तिच्या डोळ्यांत लिंबू पिळण्यात आल्याचा तसेच विविध प्रकारे त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. गरोदरपणातही जबरदस्तीने औषधांच्या गोळ्या दिल्याचा दावा तिने केला आहे. (Crime News)


याशिवाय, मुलाचा ताबा घेण्याची धमकी देणे, "तुला घटस्फोटही देणार नाही आणि दुसरे लग्नही करू देणार नाही," असे सांगून सतत मानसिक छळ करण्यात आल्याचेही महिलेने म्हटले आहे. (Crime News)



या प्रकरणात सुरुवातीला महिला समुपदेशन केंद्रामार्फत दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो यशस्वी न झाल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (Dowry Harassment)


महिलेच्या तक्रारीच्या आधारे परळी शहर पोलिसांनी संबंधित 5 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून सर्व आरोपांची पडताळणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Beed News)


Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी