Nashik TCS Case : नाशिकमधील नव्हे तर राज्यातील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात आता आणखी दोघांना जामीन मंजूर झाला आहे. पुणे येथील टीसीएसच्या एचआर विभागातील अश्विनी चेनानी आणि नाशिकमधील दानिश शेख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणात अश्विनी चेनानीला तूर्तास दिलासा मिळाला असला तरी दानिश शेख अडचणीतच आहे. (Nashik TCS Case)
- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास बुलढाणा\गिरडा : गिरडा ...
जामीन मंजूर होऊनही तुरुंगातच
महत्त्वाचे म्हणजे पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणार नसल्याच्या अटीवर न्यायालयाने अश्विनी चेनानी आणि दानिश शेख या दोघांना जामीन दिला आहे. मात्र, दानिश शेख याच्याविरोधात इतर गुन्हेही दाखल असल्याने त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात जामीन मंजूर होऊनही त्याची कारागृहातून तातडीने सुटका होणार नसून त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. (Nashik TCS Case)
आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी शिवसेना कटिबद्ध; वारकऱ्यांसाठी यंदा प्रथमच एअर अँम्ब्युलन्स सेवा, बाइक ...
अश्विनी चेनानीवर आरोप काय ?
टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. तपासादरम्यान पीडित महिला कर्मचाऱ्यांनी या घटनांची माहिती वेळोवेळी कंपनीच्या मुख्य कार्यालयातील एचआर विभागाच्या अश्विनी चेनानी यांना दिली होती. मात्र, संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिन्यांपूर्वी तपास यंत्रणांनी तिला अटक केली होती. (Nashik TCS Case)
Nashik : टी.जे.एस.बी. सहकारी बँकेची (T.J.S.B. Sahakari Bank) तब्बल ३८ कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बाफना ज्वेलर्सचे (Bafna Jewellers) संचालक निलेश ...
निदा खानही जामिनावर बाहेर
दरम्यान, यापूर्वीच नाशिक टीसीएस कंपनीमधील महिला अत्याचार आणि कथित धार्मिक बळजबरी प्रकरणातील महिला आरोपी निदा खान हिला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना न्यायालयाने केलेल्या निरीक्षणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कोणत्याही मुलाला तुरुंगात जन्म घेण्याचा मानसिक आघात किंवा त्यासोबत येणारा सामाजिक कलंक सहन करावा लागू नये,अशी टिप्पणी विशेष न्यायाधीश के. जी. जोशी यांनी आपल्या आदेशात नोंदवलीहोती. तसेच टीसीएस कंपनीत सहकाऱ्याचा कथित धार्मिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले रझा रफिक मेमन (Raza Rafiq Memon) , तौसिफ बिलाल अत्तार (Tausif Bilal Attar) आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (Shahrukh Hussain Shaukat Qureshi) या तिन्ही संशयितांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर यापूर्वी जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.