Eknath Shinde : मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यामागे घातपाताचा कट होता का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल; विरोधी पक्षानेत्याने जबाबदारीने वागणे अपेक्षित


मुंबई (Mumbai): "ज्या ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी नाही, त्या ठिकाणी लोकांना जमण्याचे आवाहन करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे होते? पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाबत काही घातपाताचा कट होता का? देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होता का?" असे सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी उपस्थित केले.(Eknath Shinde)



राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांच्यावर घटनात्मक जबाबदारी आहे. अशा पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून चुकीचा पायंडा पाडल्याचा आरोप शिंदे यांनी केला. जिथे कोणालाही आंदोलन करता येत नाही, त्या ठिकाणी लोकांना बोलावणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा हा प्रयत्न होता, असेही ते म्हणाले.(Rahul Gandhi)



नीट परीक्षेच्या पेपरफुटीची घटना दुर्दैवी आहे आणि केंद्र सरकारने त्यानंतर तातडीने कठोर पावले उचलल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने स्वतः या प्रक्रियेकडे लक्ष देत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सर्वोच्च स्तरावरून हस्तक्षेप करण्यात आला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे काम सरकारने केले, मात्र विरोधकांनी त्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न केला," असा आरोपही शिंदे यांनी केला.(Neet)

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण