Tuesday, July 21, 2026

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण समाज हादरला असून, पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी आणि नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

या भेटीदरम्यान पालकमंत्री पंकज भोयर यांनी या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात जलदगतीने (Fast-track court) चालवली जावी आणि या प्रकरणात विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) नियुक्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी केली. मुलींच्या सुरक्षेबाबत सरकारकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांची गंभीर दखल व तात्काळ निर्देश

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, कायदा आणि न्यायपालिका विभागाच्या सचिवांना विनाविलंब योग्य कारवाई करण्याचे तात्काळ निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कठोरतम शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. पोलीस प्रशासनाकडूनही या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई टाळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी पावले उचलत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >