Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apoorva Nemlekar) घराघरात पोहोचली. मात्र, काही वादांनंतर तिने ही मालिका सोडली होती. त्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री कृतिका तुळसकर (Kritika Tulaskar) हिने ‘शेवंता’ची भूमिका साकारली. आता या दोघींमधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.





अलीकडेच एका पॉडकास्ट (Podcast) मुलाखतीत अपूर्वा नेमळेकरने कृतिका तुळसकरला ‘अनप्रोफेशनल’ (Unprofessional) अभिनेत्री म्हटले होते. या आरोपांना उत्तर देताना कृतिकाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक व्हिडीओ (Video) शेअर करत सडेतोड भूमिका मांडली आहे. व्हिडीओसोबत कृतिकाने लिहिले, “मी नेहमी माझ्या कामाला बोलू दिलं आहे. ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, त्यांनाच माझ्या प्रोफेशनलिझम (Professionalism) बद्दल बोलण्याचा अधिकार आहे. बाकी प्रत्येक मत हे फक्त एक मत असतं.”



व्हिडीओमध्ये कृतिका म्हणाली, “‘रात्रीस खेळ चाले’मधील अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे, असं म्हटलं जात आहे. पण अनप्रोफेशनलिझम म्हणजे नेमकं काय? सेटवर वेळेवर न पोहोचणं, दिग्दर्शकाला वाट पाहायला लावणं, सहकलाकारांशी आणि निर्मात्यांशी योग्य वागणूक न देणं, तसेच ‘माझ्यामुळेच मालिकेचा टीआरपी (TRP) वाढतो’ असा माज दाखवणं, याला अनप्रोफेशनलिझम म्हणतात.”


ती पुढे म्हणाली, “एखादा निर्माता (Producer) मालिकेसाठी लाखो रुपये खर्च करत असतो. अशावेळी मालिका सोडताना त्याचा, सहकलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा विचार न करणं, हेही अनप्रोफेशनल वर्तन आहे. मात्र, एका रात्रीत नवीन कलाकार म्हणून जबाबदारी स्वीकारून, कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्या भूमिकेला न्याय देणं, यालाच प्रोफेशनलिझम म्हणतात.” अपूर्वा नेमळेकरने मुलाखतीत कृतिकाने तिला फोन (Phone) करायला हवा होता, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावरही कृतिकाने स्पष्ट उत्तर दिले.


“मी तिला फोन का करावा? आमची आधीपासून ओळख नव्हती किंवा आम्ही मैत्रिणीही नव्हतो. माझ्याकडे एक चांगली संधी आली होती. ती स्वीकारून त्या भूमिकेला न्याय देणं, ही माझी जबाबदारी होती. मी कोणालाही स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी बांधील नव्हते,” असे कृतिका म्हणाली.


तिने पुढे सांगितले, “आम्ही कधीच एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळे मी सेटवर कशी वागते, याबद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. भविष्यात माझ्याविषयी कोणत्याही माध्यमात बोलताना थोडा विचार करावा. हाच खरा प्रोफेशनलिझम आहे.” दरम्यान, कृतिका तुळसकरचा हा व्हिडीओ सोशल मीडिया (Social Media) वर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला असून, नेटकरी दोन्ही अभिनेत्रींच्या भूमिकांवर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या