Ahilyanagar : अहिल्यानगरात ३० लाख रूपयांचे एमडी ड्रग्स जप्त; तीन जण ताब्यात

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत ३० लाख रूपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. सावेडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरात तोफखाना पोलिसांच्या (Tofkhana Police Station) गुन्हे शोध पथकाने रविवारी ही धडक कारवाई करत सुमारे ३० ते ३२ लाख रुपये किमतीचे १५० ते १६० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) (MD Drugs) जप्त केले आहे. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर अन्य दोघे संशयित पसार झाले आहेत. कारवाईत पोलिसांनी एक विनाक्रमांकाची कार देखील जप्त केली आहे. (Ahilyanagar Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक मिस्किनमळा परिसरात गस्त घालत होते. यावेळी पथकाला एक विनाक्रमांकाची स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला मात्र पोलिसांना बघताच चालकाने वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले. कारवाईची चाहूल लागताच वाहनातील दोघे जण फरार झाले. तर वाहनातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तसेच वाहनाची कसून झडती घेतली असता १५० ते १६० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. (Ahilyanagar Crime News)



पोलिसांनी पिस्तुलासारखे दिसणारे एक लायटर, एक एअर गन, मास्क, कटावणी आणि दरोडा टाकण्यासाठी वापरले जाणारे अन्य साहित्यही जप्त केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) तातडीने फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. प्राथमिक तपासणीत जप्त केलेला पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे ३० ते ३२ लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime News)


दरम्यान, या प्रकरणात वसीम खलील बागवान (वय ३८, रा. पिंजर गल्ली, चाचा मेससमोर), झिशान शौकत सय्यद (वय २७, रा. सहारा कॉलनी, मुकुंदनगर) आणि रेहान जावेद शेख (वय २४, रा. छोटी मशीद, मुकुंदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जमीर भाई आणि एक अनोळखी इसम पसार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे