BMC News : प्रसुतीगृहांमध्ये माता व बाल रुग्णालयाच्या धर्तीवर वैद्यकीय उपचार, महापालिका सभागृहात ठराव

पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे प्रशासनाचे निर्देश


मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व प्रसुतीगृहांची दर्जोन्नती त्याठिकाणी माता व बाल रुग्णालयाच्या धर्तीवर गरोदर महिलांस नवजात तथा लहान बालकांसाठी एकाच छताखाली वैद्यकीय उपचार केंद्र उभारले जाणार आहे. माता व बाल रुग्णालयाच्या धर्तीवर प्रसुतीगृहांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे. सभागृहात भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी मांडलेल्या ठरावावर अनेक महिला नगरसेविकांनी आपल्या सूचना मांडत या ठरावाचे स्वागत केले. त्यामुळे यावर त्वरीत अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे (Mayour Ritu Tawde) यांनी प्रशासनाला दिले आहे.


मुंबई महापालिका (BMC) सभागृहात माता व नवजात तथा लहान बालकांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन 'माता व बाल रुग्णालय' अशी आरोग्यविषयक यंत्रणा प्रसुतीगृहांमध्येच एकाच छताखाली कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी भाजप (BJP) नगरसेविका प्रिती सातम यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिका सभागृहात केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील २८ प्रसुतिगृहांमध्ये प्रामुख्याने गर्भवती महिलांची प्रसूती सेवा उपलब्ध करुन दिली जाते. मात्र, आजच्या काळात प्रसूती नंतर नवजात बालकांमध्ये जन्मतः आढळून येणारे आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार अशाप्रकारच्या इतर आजारांवर वेळेवर निदान करुन त्यांच्यावर तातडीच्या योग्य उपचाराकरिता तसेच बालरोगतज्ज्ञांची सेवा, नवजात अतिदक्षता विभाग, लसीकरण, पोषण सल्ला आणि माता-बालक आरोग्याच्या सर्वसमावेशक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.



मात्र, अनेक प्रसुतिगृहांमध्ये प्रसूतीनंतर नवजात बालक आजारी पडल्यास त्याला उपचारार्थ दुसऱ्या लांब पल्ल्याच्या महापालिका रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात हलवावे लागते. त्यामुळे बालकास त्वरित उपचार मिळण्यास विलंब होतो. पर्यायाने, पालकांची आर्थिक, मानसिक व शारीरिक गैरसोयही होते. त्यामुळे केवळ या सुविधा प्रसुतिगृहापुरत्याच मर्यादीत न राहता या सर्व प्रसुतिगृहाचे रुपांतर 'माता व बाल रुग्णालय' यामध्ये करणे आवश्यक आहे,असे म्हटले आहे.


यावर भाजप नगरसेविका डॉ. शिल्पा सांगोरे यांनी या ठरावाचे स्वागत करून माता व बाल रुग्णालयाच्या धर्तीवर प्रसुतीगृहांमध्ये उपचार मिळणे आवश्यक आहे. नवजात बालकाला मातेकडून स्तनपान होणे आवश्यक असते आणि बऱ्याच वेळा एनआयसीयू केंद्र दुसरीकडे असल्यामुळे माता एकीकडे आणि बालक दुसरीकडे असतात. तर स्वप्ना म्हात्रे यांनी एच पश्चिम विभागात एनआयसीयूकरता आरक्षित भूखंड आहे. त्या भूखंडावर एनआयसीयू (NICU) केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी केली. तर विशाखा राऊत यांनी पिडियाट्रीक डॉक्टरांची एनआयसीयूसाठी मोठी गरज असते. त्यामुळे असे न्युओनिटल उपलब्ध झाला तरी डॉक्टर नसल्याने ही सुविधा मिळत नाही,त्यामुळे डॉकटरांची भरती करण्यात यावी अशी सूचना केली. तर सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी संपूर्ण मुंबईत महापालिकेच्यावतीने केवळ एनआयसीयूच्या केवळ ३२० बेड्स असून याबाबत दोन वेळा बैठका घेवून कर्मचारी व डाॅक्टर वाढवण्याची सूचना करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी अर्थसंकल्पीय भाषणात अशा मुद्दयाकडे आपण प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. पण अद्यापही प्रशासनाचे लक्ष नसून पुढील अर्थसंकल्पात असा मुद्दा उपस्थित करण्याची वेळ येवू नये याची खबरदारी घेवून याबाबतची कार्यवाही केली जावी अशी सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत जागृती पाटील, शीतल गंभीर तसेच सभागृहनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आदींनी भाग घेतला. यावर महापौर रितू तावडे यांनी खासगी स्वयंसेवी संस्थाकडून प्राप्त होणारी मदत तसेच डॉक्टरांची भरती तसेच नर्सेसची भरती प्रक्रिया करून याचा अहवाल पुढील बैठकीत सादर केला जावा असे निर्देश प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास