FIFA World Cup 2026 : स्पेनकडून अंतिम फेरीत पराभवानंतर भावूक झाला मेस्सी; Video व्हायरल

FIFA World Cup 2026 :  फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनावर ( Argentina) 1-0 असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अतिरिक्त वेळेतील फेरान टोरेसच्या निर्णायक गोलामुळे स्पेनने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या पराभवानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ( Lionel Messi)



अंतिम शिट्टी वाजल्यानंतर स्पेनचे खेळाडू विजयानंद ( World Cup Final) साजरा करत असताना मेस्सी काही काळ मैदानावर शांत बसून राहिला. त्याच्या चेहऱ्यावर पराभवाची निराशा स्पष्ट दिसत होती. पुरस्कार वितरणावेळी गळ्यात रौप्यपदक घालून उभा असलेला मेस्सी वारंवार अर्जेंटिनाच्या चाहत्यांकडे पाहत होता. त्याच्या भावनिक क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ (Messi Emotional Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

39 वर्षीय मेस्सीसाठी हा विश्वचषक कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. 2022 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या मेस्सीला यावेळी सलग दुसरे विजेतेपद जिंकण्याची संधी होती. मात्र स्पेनच्या मजबूत बचाव आणि संयमी खेळामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. ( FIFA World Cup 2026)

पहा व्हिडिओ 





सामन्यानंतर अर्जेंटिनाचे ( Argentina vs Spain) मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी आपल्या खेळाडूंचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे ही मोठी कामगिरी आहे आणि संघाने संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम प्रयत्न केले. विजयात जसा आत्मविश्वास ठेवला, तसाच पराभवही स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

सामन्याच्या 90 मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नव्हता. त्यानंतर अतिरिक्त वेळेत 106 व्या मिनिटाला बदली खेळाडू फेरान टोरेसने निर्णायक गोल करत स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पराभवानंतरही अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी मेस्सी आणि संपूर्ण संघाला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. (Spain)

 
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे