BEST Bus Accident : मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, एका वृद्धाचा मृत्यू, अनेक जण जखमी

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी बेस्ट बसचा अपघात झाला. सायन-पनवेल (Sion Panvel Highway) महामार्गावरील विश्वकर्मा रुग्णालयासमोर मार्ग क्रमांक ५०१ ची बेस्ट बस रस्त्यावरील दुभाजकावर धडकली. या अपघातात दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून चालक, वाहक आणि प्रवाशांसह एकूण ८ जण जखमी झाले आहेत. (BEST Bus Accident)

ही घटना सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Mankhurd)

राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये बसचे वाहक वैभव वाघमारे (४१) आणि चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (५१) यांचा समावेश असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच रस्त्याच्या दुभाजकाजवळ उभे असलेले भास्कर रावसाहेब पांडे (६५) यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. (Road Accident)

पाच जणांवर उपचार सुरु


गोवंडी शताब्दी रुग्णालयात पाच जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शिवमंगल मैती (४२), गणेश पटेल (२४), लता वाघेला (४३), राजेश वरुगामिना (३५) आणि अंकिता जाधव (२२) यांचा समावेश आहे. सर्वांवर आपत्कालीन विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Mumbai News)



अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार बसने नियंत्रण गमावल्याने ती दुभाजकावर आदळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सायन-पनवेल महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. (Accident news)

 

 
Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.