Nashik Crime News : गणेशच्या आत्महत्येचा उलगडा होणार, सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातील परिसरातील गणेश भिका गायकवाड (Ganesh Bhika Gaikwad) या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून समाजात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याच्या मानसिक त्रासातून गणेशने हे टोकाचे पाऊल उचलले होते. आता पोलिसांना सुसाईड नोट (Suicide note) सापडल्याने गणेशच्या मृत्यूचा उलगडा होण्यास पोलिसांना मदत होणार आहे. आत्महत्येपूर्वी गणेश यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, त्यात तीन जणांची नावे स्पष्टपणे लिहिण्यात आली आहेत. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश गायकवाड हे सातपूर परिसरातील (Satpur ) श्रमिक नगर भागात राहत होते. काही दिवसांपूर्वी संशयितांनी त्यांच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा खोटा असल्याचा दावा गणेशच्या (Ganesh Bhika Gaikwad) कुटुंबाने केला आहे. धक्कादायक म्हणजे या गुन्ह्यामुळे समाजात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी झाल्याने गणेश अत्यंत मानसिक तणावाखाली होते. (Nashik Crime News)



'माझे जगणे असह्य झाले आहे’, अशी खंतही त्यांनी पत्नीकडे बोलून दाखवली होती. अखेर याच विवंचनेतून त्यांनी १६ जुलै २०२६ रोजी सकाळी डीजीपी नगर येथील इच्छामनी रो-हाउस येथे गळफास लावून आपले जीवन संपवले हाेते. दरम्यान मिळालेल्या सुसाईड नोटच्या Suicide note) आधारे मृताची पत्नी शितल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात (Upngar Police Station) तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकुमार जेना, एक महिला आणि प्रशांत कोकदादे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. (Nashik Crime News)



मुलांना आणि आईला जीव लाव


​घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना गणेश गायकवाड (Ganesh Bhika Gaikwad) यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी पत्नीस, “प्रिय शितल, माझी सोसायटीमध्ये खूप बदनामी झाली आहे. माझ्या पाठीमागे मुलांना आणि आईला जीव लाव. माझ्या आत्महत्येस कारणीभूत…” असे म्हणत त्यांनी सुकुमार जेना, एक महिला आणि प्रशांत कोकदादे या तिघांची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून उपनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र एका गुन्ह्यामुळे आणि समाजातील बदनामीच्या भीतीने गणेशने हे पाऊल उचलल्याने कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

Nashik : १,३८० ग्रामपंचायतींमध्ये ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान ! ३१ मार्चपर्यंत पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश; १ एप्रिलपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी

Nashik : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक

Mumbai Music Festival : दादरमध्ये तीन दिवस सुरांची बरसात! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

मुंबई : संगीतप्रेमी रसिकांसाठी मुंबईत तीन दिवसीय ‘गायन वादन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र

Nashik : अन्न भेसळीवर प्रशासनाचा पंचवटीत दणका; सणासुदीआधी तीन लाखांचा साठा जप्त

Nashik : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध

अजित आगरकर निवड समितीवरून गेले तर गिलच्या टीमचं काय होणार? वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी नवा पेच

भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिलच्या

Nashik : नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, प्रभावी दस्तऐवजीकरण करा, आयुष प्रसाद यांचे आवाहन

Nashik : प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी प्रत्येक विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून

Short Circuit : लालबागच्या राजाच्या मंडपात मुखदर्शनाच्या रांगेत शॉर्टसर्किट; भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण