Maharashtra Government : राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींना अर्थबळ!

जन सुविधा निधीत मोठी वाढ; दिवाबत्तीसह सौरऊर्जा आणि क्रीडांगण विकासासाठी मिळणार विशेष अनुदान


मुंबई(Mumbai) : राज्यातील ग्रामीण भागाचा विकास अधिक गतीने व्हावा आणि ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा बळकट करता याव्यात, यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेत ग्रामपंचायतींच्या निधीत वाढ केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी मिळणाऱ्या विशेष अनुदान योजनेतील कामांची व्याप्ती व्यापक करीत त्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, क्रीडांगण विकास, वाचनालय यांसारख्या नवीन पाच कामांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.



ग्रामीण भागातून सातत्याने होणाऱ्या मागण्या आणि स्थानिक विकासाची वाढती निकड लक्षात घेऊन सरकारने जनसुविधा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या निर्णयानुसार, समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक नवीन कामासाठी स्वतंत्र खर्चाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी सर्वाधिक २० लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.



गावांमध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच गावातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल्स बसवण्यासाठी २० लाख रुपये, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी वाचनालय इमारत बांधकामासाठी २० लाख रुपये, आणि ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडांगणाचा विकास करण्यासाठी २० लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. याशिवाय गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचे सौंदर्याकरण करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी खर्च करता येईल.




निधीचा अपव्यय टाळण्यासाठी खबरदारी


दरम्यान, शासकीय निधीचा अपव्यय टळवा आणि या कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी सरकारने एक कठोर नियमावली तयार केली आहे. या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे अन्य कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक योजनेमधून पुन्हा प्रस्तावित करता येणार नाहीत अथवा ती दुबार घेता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायतींना आपल्या गावाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागातील सार्वजनिक सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.