पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती; पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना
मुंबई : मुंबई उपनगरातील महत्त्वाकांक्षी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळाली असून, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची माहिती, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी दिली.
मंत्री शेलार यांनी सोमवारी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाची पाहणी केली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका हेतल गाला मोरवेकर, दीपिका घाग आणि संबधीत अधिकारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य क्षेत्रात हा प्रकल्प प्रस्तावित असून, भांडूप पंपिंग स्टेशनलगत ठाणे खाडीच्या किनारी सुमारे २०.०९ हेक्टर क्षेत्रात त्याची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी केवळ ०.३५ हेक्टर क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक व कमी हस्तक्षेपाच्या तत्त्वावर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.(Ashish Shelar)
पुणे : पुण्यातील (Pune) उद्योगपती (Businessman) विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरण (Murder Case) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणाला एक ...
या परिसरात कांदळवन परिसंस्था, दलदलीचे अधिवास, खारफुटी क्षेत्रे तसेच स्थानिक व स्थलांतरित सुमारे २५० विविध जातीच्या पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकल्पामध्ये पक्षीनिरीक्षण केंद्रे, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा, हरित क्षेत्र विकास, नैसर्गिक अधिवास संवर्धन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास, जैवविविधतेला चालना मिळण्यास, पर्यटन विकासास गती मिळण्यास तसेच स्थानिक नागरिकांसाठी विरंगुळा व पर्यावरण शिक्षणाचे प्रभावी केंद्र उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.
मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( Uddhav Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay raut) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार ...
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- या प्रकल्पामध्ये २.१६ किलोमीटर लांबीचा मॅग्रोव्ह नेचर ट्रेल, पक्षी निरीक्षण केंद्रे, व्ह्यूइंग डेक्स, बहुमजली वॉच टॉवर्स, बटरफ्लाय गार्डन, जेट्टी, नेचर इंटरप्रिटेशन सेंटर व व्याख्यानगृह, बाह्य पार्किंग सुविधा तसेच इतर पर्यावरणपूरक पर्यटन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे साहित्य व नियोजन परिसंस्थेला कमीत कमी बाधा पोहोचेल, अशा पर्यावरणपूरक तत्त्वांवर आधारित असेल.
- भांडूप पक्षी उद्यान हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पक्षी शोध व निरीक्षण प्रणाली असलेले पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. सुमारे १.५ किलोमीटर परिसरात रिअल-टाईम पक्षी निरीक्षण, एआय आधारित पक्षी ओळख प्रणाली, स्वयंचलित ट्रॅकिंग, इव्हेंट ॲनालिटिक्स, रेकॉर्डिंग, प्लेबॅक आणि जैवविविधता दस्तऐवजीकरण यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच डिजिटल लेन्स इंटिग्रेशन, केंद्रीकृत डेटा व्यवस्थापन, लाईव्ह सिंक्रोनायझेशन आणि परस्परसंवादी डिजिटल प्रणालीमुळे देश-विदेशातील पर्यटक, संशोधक, पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठरणार आहे.
मुंबई : मुंबईत (Mumbai) स्वतःचे घर (Home) घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडा (MHADA) मुंबई गृहनिर्माण व ...
पर्यावरण विभागाच्या परवानग्या मिळाल्या
महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र इको-टुरिझम बोर्डाची मान्यता, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक सीआरझेड मंजुरी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांची तांत्रिक मान्यता देखील प्राप्त झाली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून ४५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मंत्री शेलार यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत पर्यटन यांचा प्रभावी संगम साधला जाणार असून, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पर्यावरणीय व पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असेही पालकमंत्री शेलार यांनी सांगितले आहे.