Amit Shah : प्रत्येक विद्यार्थ्याने मातृभाषेसह आणखी एक भारतीय भाषा शिकावी : अमित शहा

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालय परिसरात देशातील पहिले भाषा संग्रहालय ‘शब्दलोक’ (म्युझियम ऑफ वर्ड्स) याचे उद्घाटन केले. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रंथालयाने विकसित केलेले हे संग्रहालय भारतातील भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणार आहे.(Amit Shah)



यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, भाषा ही कोणत्याही देशाच्या वारशाची जपणूक करणारी आणि त्या देशाची संस्कृती समजून घेण्याचे प्रभावी माध्यम असते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मातृभाषेबरोबरच किमान आणखी एक भारतीय भाषा शिकावी, त्यामुळे देशाच्या विविध संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील, असे त्यांनी सांगितले.(Political News)



ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, देशाचे भविष्य केवळ महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून नसून, किती नागरिक ग्रंथालयांचा उपयोग करतात यावरही ते ठरते. बंगालच्या बौद्धिक परंपरेचा गौरव करताना त्यांनी साहित्य, विज्ञान, क्रांती आणि शिक्षण क्षेत्रात राज्याने दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच बंगाल पुन्हा एकदा देशाला दिशा देणारे राज्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



'शब्दलोक' संग्रहालयात नऊ दालने असून, भारतातील २२ अधिकृत भाषांचा इतिहास, लिपी, साहित्य, मौखिक परंपरा, प्राचीन हस्तलिखिते, मुद्रित साहित्य आणि आधुनिक डिजिटल लेखनाचा प्रवास आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आला आहे. डिजिटल डिस्प्ले, होलोग्राम आणि मोशन सेन्सर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे संग्रहालय अभ्यागतांना एक वेगळा सांस्कृतिक अनुभव देणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे