Nashik Crime News : नाशिकच्या 'या' माजी महापौराला 200 तोळ्यांचा गंडा, गुन्हा दाखल

Nashik Crime News : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'सोने दुप्पट करून देतो' या आमिषाला बळी पडल्यामुळे नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल २०० तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


फिर्यादीनुसार दोन वर्षांपूर्वी माजी महापौर अशोक मुर्तडक यांची संशयित योगेश बाळकृष्ण दाभाडे (रा. नाशिक) याच्याशी ओळख झाली. त्याने घरातील महिलांचा विश्वास संपादन केला आणि महिलांना 'सोने दुप्पट करून देतो' असे आमिष दाखविले. मुर्तडक यांच्या आई दुर्गाबाई मुर्तडक आणि मावशी विठाबाई धात्रक यांनी त्यांच्या निधनापूर्वी स्त्रीधनातील जुने दागिने कुटुंबातील महिलांना वाटून दिले होते. त्यामध्ये पत्नी आशा मुर्तडक यांना १०० तोळे, मुलगी रोशनी हिला ५० तोळे आणि सून पूजा मुर्तडक यांना ५० तोळे, असे एकूण २०० तोळे सोन्याचे दागिने मिळाले होते. हे सर्व सोने दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून दाभाडे याने १ जानेवारी २०२५ पूर्वी घरातील महिलांकडून सोनं ताब्यात घेतलं.(Nashik Crime News)



फसवणुकीचा गुन्हा दाखल


मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलांनी हा विषय अशोक मुर्तडक यांना सांगितला. त्यानंतर मुर्तडक यांनी संशयिताला घरी बोलावून किमान मूळ दागिने परत करण्याची विनंती केली. त्यावेळी दाभाडे याने दागिने परत करण्याची ग्वाही दिली. मात्र दीड वर्ष उलटूनही दागिने अद्याप परत केले नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुर्तडक यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पंचवटी पोलिसांनी संशयित योगेश दाभाडे याच्याविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत.(Nashik Crime News)



एप्रिलमध्ये दाभाडेकडून मुतर्डकांवर गुन्हा


चालू वर्षात म्हणजेच एप्रिल २०२६ मध्ये संशयित योगेश दाभाडे याने अशोक मुर्तडक यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यात, मुर्तडक यांनी वर्षभरापूर्वी ९० लाख रुपये हातउसनवार घेतल्याचे नमूद केले हाेते. काही रकमेची परतफेड केल्यानंतर उर्वरित पैशांसाठी मुर्तडक यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सतत मानसिक त्रास दिला. या कथित छळाला कंटाळून दाभाडेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर, मुर्तडकांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पंचवटी पोलिस (Panchvati Police) सध्या या दोन्ही परस्परविरोधी प्रकरणांचा आणि कोट्यवधींच्या सोन्याच्या अपहाराचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : आजपासून मुंब्रा नव्हे 'मुंब्रादेवी'च म्हणा!

- मंत्री नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन; कोणाच्याही दहशतीला भीक घालू नका मुंबई : "मुंब्रा हे शहर कोणत्याही एका

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

West Bengal : पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपाध्यक्ष आशिष बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात उचलले टोकाचे पाऊल

रामपूरहाट : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला