Government documents : 'या' १० सरकारी कागदपत्रांसाठी सरकार नक्की किती फी आकारते ?

तुमच्या फाईलमध्ये आहेत का 'ही' १० सरकारी कागदपत्रे? आजच तपासा, नाहीतर...


मुंबई : तुम्हाला माहितीये का ? जर तुम्ही भारतात राहत असाल, तर तुमच्याकडे काही विशिष्ट सरकारी कागदपत्रे असणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा ही कागदपत्रे काढण्यासाठी आपण एजंटकडे चकरा मारतो आणि शेकडो-हजारो रुपये मोजतो. पण या कागदपत्रांसाठी सरकारची अधिकृत फी किती आहे, हे तुम्हाला माहितीये का ? आज मी तुम्हाला अशी १० डॉक्युमेंट्स आणि त्यांची खरी फी सांगणार आहे. हा व्हिडिओ आत्ताच 'सेव्ह' करा, कारण ही माहिती तुमच्या खूप कामी येणार आहे!






सर्वात आधी, प्रत्येकाची मुख्य ओळख असलेलं आधार कार्ड. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की नवीन आधार कार्ड काढण्यासाठी सरकारी फी पूर्णपणे 'मोफत'आहे! त्यानंतर येतं बँक आणि टॅक्सच्या कामांसाठी लागणारं पॅन कार्ड. पॅन कार्ड काढण्यासाठी सरकारची अधिकृत फी फक्त १०७ रुपये इतकीच आहे." आता पाहूया विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीसाठी लागणारे अत्यंत महत्त्वाचे दाखले.(Important documents)



जातीचा दाखला, रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला... या प्रत्येक प्रमाणपत्रासाठी सरकारी फी फक्त ३० रुपये आहे! होय, फक्त ३० रुपये!


तसेच, जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी केवळ २० रुपये इतकेच सरकारी शुल्क आकारले जाते. या व्यतिरिक्त तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि मतदान ओळखपत्र असणेही गरजेचे आहे. मित्रांनो, जर या १० पैकी एकही कागदपत्र तुमच्याकडे नसेल, तर तुमची अनेक महत्त्वाची सरकारी कामे अडकू शकतात, स्कॉलरशिप किंवा नोकरीच्या संधी हुकू शकतात. त्यामुळे आजच तुमची फाईल तपासा आणि जे डॉक्युमेंट नसेल ते लगेच बनवायला घ्या."आता तुम्ही म्हणाल ही कागदपत्रे काढायची कुठून? तर ही सर्व कागदपत्रे तुम्ही अधिकृत सरकारी वेबसाईट्सवरून घरबसल्या बनवू शकता. या सगळ्या लिंक्स आणि प्रक्रियेची सविस्तर माहिती तुम्हाला publicseva.in या वेबसाईटवर मिळेल. आहे ना महत्त्वाची माहिती? मग तुमचे आणि तुमच्या नातेवाईकांचे पैसे वाचवण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आत्ताच प्रहार न्यूजलाईनला फॉलो करा!"

Comments
Add Comment

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते