Saturday, July 18, 2026

Dr. Kumar Saptarshi : डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन, समाजवादी विचारांचा बुलंद आवाज हरपला

Dr. Kumar Saptarshi : डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन, समाजवादी विचारांचा बुलंद आवाज हरपला

पुणे : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले डॉ. कुमार सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, समाजवादी आणि गांधीवादी चळवळीतील एक प्रभावी आवाज हरपला आहे.

डॉ. सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) यांना मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी सकाळी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुण्यातील एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने समजताच सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. हजारो कार्यकर्ते आणि अनुयायांनी त्यांच्या कार्याला स्मरण करत श्रद्धांजली वाहिली.

डॉ. कुमार सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) यांनी संपूर्ण आयुष्य समाज परिवर्तनाच्या चळवळीसाठी समर्पित केले. युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करून लोकशाही मूल्यांवर आधारित परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली. युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी असंख्य तरुणांना सामाजिक प्रश्नांबाबत जागृत केले. अन्याय, विषमता, भ्रष्टाचार आणि शोषणाविरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी अनेक पिढ्यांना दिली.

डॉ. सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) यांच्या कार्यावर महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारसरणीचा खोल प्रभाव होता. अहिंसा, सत्य, लोकशाही आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या आधारावर त्यांनी आपले सार्वजनिक जीवन घडवले. ग्रामीण विकास, शिक्षण, युवकांचे सक्षमीकरण आणि लोकशाही हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलनांमध्ये ते सक्रिय सहभागी राहिले. डॉ. कुमार सप्तर्षी हे केवळ कार्यकर्ते नव्हते, तर ते अभ्यासू लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानांतून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी परखड भाष्य केले. समाजातील बदलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक आणि परिवर्तनवादी होता. त्यामुळेच अनेक युवकांसाठी ते मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान ठरले. (Dr. Kumar Saptarshi)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >