Nashik News : अखेर 'त्या' आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, महिला अधीक्षिका आणि वर्ग शिक्षक निलंबित

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कळवण (Kalwan) येथील मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेत (Mohandari Government Tribal Residential Ashram School) शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण नाशिक (Nashik) जिल्हयातून संताप व्यक्त करण्यात येत होता. संबंधित आश्रमशाळेवर कारवाई करावी अशी मागणी होत होती अखेर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.



आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, महिला अधीक्षिका आणि वर्ग शिक्षक निलंबित


या प्रकरणी प्रकल्प अधिकारी डॉ. कश्मिरा संखे (Dr. Kashmira Sankhe) यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीत विद्यार्थिनींच्या देखरेखीत तसेच प्रशासकीय जबाबदार्‍या पार पाडण्यात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आल्याने मोहनदरी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांच्यासह वर्ग शिक्षक तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.


संबंधित अधिकार्‍यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक दक्षता न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, या निष्काळजीपणामुळे ही गंभीर घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत नमूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, विद्यार्थिनीला आवश्यक वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनाची (Medical treatment and counseling) सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर दुसरं तिसरं कोणीच नाही तर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अत्याचारामुळे संबंधित पीडित विद्यार्थिनी गरोदर राहिली आहे अशी माहिती आहे. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात (Kalwan Police Station) पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात (Juvenile Reformatory) रवानगी करण्यात आली आहे.



आरोग्य तपासणी यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह


दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर निवासी आश्रम शाळांमध्ये होणाऱ्या आरोग्य तपासणी यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आश्रम शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमितपणे दैनंदिन आरोग्य तपासणी होते, असे असतानाही विद्यार्थिनी गरोदर (Pregnant) राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला, तरीही एवढी मोठी बाब आश्रम शाळा प्रशासनाच्या, शिक्षकांच्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, याबाबत आता संताप व्यक्त केला जात होता. या निष्काळजीपणामुळे आश्रम शाळांमधील देखरेख व्यवस्था किती खिळखिळी झाली आहे, हेच स्पष्ट होत असल्याने तात्काळ कारवाईची मागणी होत होती , त्या अनुषंगाने आता ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतुन आदिवासी विकास विभागाने यापुढे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व आश्रमशाळांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment

TMC MPs notice : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

D. K. Shivakumar : 'वंदे मातरम्'च्या पूर्ण गायनाला काँग्रेसचा विरोध, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोन कडव्यांच्या निर्णयावर ठाम

बेंगळुरू: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण गायनाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला असून,

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे