Ahilyanagar : कर्जत-जामखेडमध्ये एसआयआरचे ५० टक्के काम पूर्ण

Ahilyanagar : कर्जत-जामखेड मतदारसंघात बीएलओ यांच्यामार्फ़त मतदार याद्याचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम युद्धपातळीवर असून आजतागायत ५० टक्के काम पूर्ण झाले असून ज्या मतदारांनी अजून देखील आपले इन्यूमरेशन फॉर्म भरले नाही किंवा त्यांच्याकडे नियुक्त केलेले बीएलओ आलेच नाही त्यांनी तात्काळ संबंधित नियुक्त बीएलओशी संपर्क करीत आपले फार्म भरून घ्यावे. असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.



भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ पंकज आशिया (Dr. Pankaj Asia) यांच्या मार्गदर्शनाखाली २२७ कर्जत-जामखेड मतदारसंघात मतदार याद्याचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) राबविण्यात आला आहे. या कार्यक्रम अंतर्गत मतदारयाद्या अचूक बनवत त्यात पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे यासह दुबार नावे, मयत मतदार तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्याची मोहीम सुरू आहे. यासाठी बीएलओ, सहायक बीएलओ, पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून कर्जत-जामखेड मतदारसंघात (Karjat-Jamkhed constituency) आजमितीस सरासरी ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.


कर्जत-जामखेड मतदारसंघात एकूण ३ लाख ५० हजार ५२४ मतदार असून यातील ३ लाख ४१ हजार ७५१ मतदारांना इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) वितरीत करण्यात आले आहे. यापैकी तब्बल १ लाख ७७ हजार ८५४ मतदारांचे इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) नियुक्त बीएलओनी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत पटलावर यशस्वीपणे भरले आहेत. तर उर्वरीत १ लाख ७० ५१० मतदार इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) भरण्याचे बाकी असून ज्या मतदारांनी आपले फॉर्म भरलेच नाही किंवा त्यांच्याकडे नियुक्त केले बीएलओ आलेच नाही त्यांनी गावचे तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधत नियुक्त बीएलओचा संपर्क क्रमांक घेत आपला इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) भरण्यास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.



एसआयआरची एक प्रत मतदारांनी आपल्याकडे घ्यावी


नियुक्त बीएलओ यांच्याकडे संबंधित मतदारांचे छायाचित्र तसेच मतदार यादी, क्रमांक माहिती असलेले इन्यूमरेशन फॉर्म (एसआयआर) दोन प्रती दिले आहेत. ते दोन्ही प्रती बीएलओ मतदारांच्या समक्ष अचूक भरतील. त्या माहितीची योग्य शहानिशा केल्यावर एक प्रत बीएलओ आपल्याकडे ठेवतील तर दुसरी प्रत मतदारांनी आपल्याकडे जतन ठेवावी. भविष्यात दावे, हरकतीवेळी ती प्रत महत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे, असे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी म्हटले आहे.



कर्जत-जामखेडच्या १४ बीएलओचे १०० टक्के काम पूर्ण


कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी ३५६ बीएलओची नियुक्ती केली असून यापैकी १४ बीएलओनी १०० टक्के काम अल्पवधीतच पार पाडले. यात प्रकाश नेटके(जळगाव), अनिता टीपगुडे(माळेवाडी), नितीन गारुडकर (गायकरवाडी), अविनाश शिंगटे(नागलवाडी), संदीप तोरडमल(सुपे), किरण होले(निंबोडी), संदीप घोडके(गोयकरवाडी) संतोष वायसे(चांदे खुर्द), रामहरी बांगर(पारेवाडी), किरण माने(गुरेवाडी), संगीता खेडकर(गोंदर्डी), महादेव हजारे(अरणगाव), किसन अभिमान(धोत्री) आणि अमोल उढाणे(शिंपोरा) या बीएलओचा सन्मान जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केला.

Comments
Add Comment

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

DRDO Military Combat Parachute System test : लडाखमध्ये २२,००० फूट उंचीवरून स्वदेशी लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने लडाखमधील जगातील सर्वात उंच ड्रॉप झोनपैकी एकावर आपल्या लष्करी लढाऊ पॅराशूट प्रणालीची

TMC MPs notice : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या