Aamir Khan On Sonam Wangchuk : 'रँचो' आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही! आमिर खाननं '3 इडियट्स'च्या गैरसमजावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) ‘3 इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील ‘रँचो’ (Rancho) हे पात्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्यावर आधारित असल्याच्या चर्चांवर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘फुंसुक वांगडू’ (Phunsukh Wangdu) आणि सोनम वांगचुक यांचा थेट संबंध नसल्याचं आमिर खाननं स्पष्ट केलं आहे.



'3 इडियट्स'मधील रँचो सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नव्हता


सोनम वांगचुक सध्या दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) उपोषण (Hunger Strike) करत आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे आणि ढासळलेल्या प्रकृतीमुळे अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी चिंता व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ चित्रपटातील रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. मात्र, आमिर खाननं या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट (British Film Institute) येथे झालेल्या कार्यक्रमात त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.



यावेळी आमिर खान म्हणाला, “हा एक गैरसमज आहे. आम्ही ‘3 इडियट्स’ (3 Idiots) बनवत असताना मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani), लेखक अभिजात जोशी (Abhijat Joshi) किंवा मलाही त्यांच्याबद्दल माहिती नव्हती.”





"सोनम वांगचुक यांच्या कामाचा आदर करण्यासाठी पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही" आमिर खाननं पुढे सांगितलं की, सोनम वांगचुक यांचं काम अत्यंत प्रेरणादायी (Inspirational) आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘3 इडियट्स’मधील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही. “सोनम वांगचुक यांनी स्वतः यापूर्वी स्पष्ट केलं आहे की, चित्रपटातील पात्र त्यांच्यावर आधारित नव्हतं. मला फक्त वस्तुस्थिती (Fact) स्पष्ट करायची होती,” असं आमिर खान म्हणाला. दरम्यान, ‘3 इडियट्स’मध्ये आमिर खाननं साकारलेलं रँचो हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात लोकप्रिय आहे. मात्र, आता स्वतः आमिर खाननं या पात्राचा आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या