Crime News : घरात डॉक्टर पतीचा मृतदेह, ८ वर्षांचा मुलगा रक्तबंबाळ; पण पत्नी मात्र...

धारवाड : देशभरात घडणाऱ्या खून (Murder) आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic Violence) घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच कर्नाटकच्या (Karnataka) धारवाड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका अपार्टमेंटमध्ये (Apartment) राहणारे भूलतज्ज्ञ (Anesthesiologist) डॉ. किरण होन्नावर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा अवघा ८ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत सापडला. या प्रकरणात पोलिसांनी (Police) मृत डॉक्टरांच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून संपूर्ण घटनेचा तपास (Investigation) सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. किरण होन्नावर (वय ४५) हे धारवाडमधील पवन हायस्कूलसमोरील एका अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर पत्नी डॉ. प्रियंका कट्टनहल्ली आणि मुलासोबत राहत होते. डॉ. किरण हे खासगी रुग्णालयात (Private Hospital) भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी डॉ. प्रियंका या नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologist) असून त्यांनी ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये (Ophthalmology) एमएस पदवी प्राप्त केली आहे.



फोनवर उडवाउडवीची उत्तरं; नातेवाईकांचा संशय वाढला


पोलीस आयुक्त (Police Commissioner) एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी डॉ. किरण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी केला. मात्र त्यांचा मोबाईल पत्नी प्रियंका यांनी उचलला. त्या वेळी त्यांनी, "डॉ. किरण विश्रांती घेत आहेत", "ते ड्युटीवर (Duty) गेले आहेत", अशी वेगवेगळी उत्तरं दिली. यामुळे संशय बळावल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.


यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी (Crime Scene) धाव घेत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आत गेल्यानंतर त्यांना डॉ. किरण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याचवेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. सुदैवाने मुलाचे श्वास सुरू असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



पोलीसही हादरले; पत्नी बेडवर मोबाईल वापरत होती


या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पोलिस फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा घरात एका बाजूला डॉक्टर पतीचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला जखमी मुलगा पडलेला होता. मात्र पत्नी डॉ. प्रियंका या बेडवर शांतपणे झोपून मोबाईल (Mobile Phone) वापरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. या प्रकारामुळे पोलिसांसह परिसरातील नागरिकही हादरले.



हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट


प्राथमिक तपासात (Preliminary Investigation) घरात जबरदस्तीने प्रवेश (Forced Entry) झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. घटना घडली त्या वेळी फ्लॅटमध्ये केवळ पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. तपासादरम्यान मुलाच्या शरीरावर धारदार शस्त्राने (Sharp Weapon) वार झाल्याच्या जखमाही आढळल्या आहेत.


फॉरेन्सिक पथकाने (Forensic Team) घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून पोलिसांनी हत्येचा (Murder Case) गुन्हा दाखल केला आहे. हत्येमागील नेमकं कारण, घटनाक्रम आणि त्यामागचं सत्य उघड करण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या धक्कादायक प्रकरणामागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Perfect Tea Tips : चहा बनवताना दूध आधी टाकावं की नंतर ? घरी टपरीसारखा कडक चहा बनवा अन् 'या' सोप्या ट्रिक्स वापरून वाढवा चहाची चव!

मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की रिमझिम पावसात हातात गरमागरम चहाचा कप धरून बसण्याची मजा काही वेगळीच असते.

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक

Devendra Fadnavis : पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "