Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय


नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने समुद्री प्रशासन महासंचालनालयाने (डीजीएमए) मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांची नियुक्ती करू नये असे डीजीएमएने जहाज मालक, जहाज व्यवस्थापक आणि भरती करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.



डीजीएमएने बुधवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, फारसच्या आखातातील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता भारतीय नाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे संघर्षग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या नाविकांसाठी धोका वाढला आहे.सरकारी आकडेवारीनुसार, भारत हा जगातील समुद्री कर्मचारी (सीफेअर्स) पुरवठा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगभरातील जहाजांवर 3 लाखांहून अधिक भारतीय नाविक कार्यरत आहेत.या भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध हल्ल्यांमध्ये 2 भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीएमएने आपल्या आदेशात कंपन्यांना सांगितले आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांची नियुक्ती टाळावी.



डीजीएमएच्या सूचनेनुसार, जहाज मालकांनी फारसचा आखात, होर्मुज सामुद्रधुनी आणि आसपासच्या समुद्री भागातील सुरक्षा परिस्थितीबाबत सतर्क राहावे तसेच नौवहनासंबंधी इशाऱ्यांचे नियमितपणे निरीक्षण करावे. बदलत्या सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि भारतीय नाविकांची सुरक्षा व कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे डीजीएमएने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत