Sangamner : बोटा गटात काँग्रेसला खिंडार, युवक काँग्रेस महा सचिवांसह असंख्य कार्यकर्त्यांचा आ. खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Sangamner : संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून युवक काँग्रेसचे तालुका महासचिव सुमित फटांगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे बोटा गटात काँग्रेसला खिंडार पडले आहे या प्रवेशामुळे वरुडी पठार परिसरात महायुतीची ताकद अधिक बळकट झाली असून काँग्रेसच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे.



'यांनी' केला पक्षप्रवेश


भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे तालुका महासचिव सुमित फटांगरे, वरुडी पठार तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष फटांगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल फटांगरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार खताळ यांनी स्वागत करत त्यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून शुभेच्छा दिल्या.


यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाला प्राधान्य देणारे निर्णय घेतले जात आहेत. विकासाच्या या भूमिकेवर विश्वास ठेवून विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. वरुडी पठारातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे महायुतीची ताकद आणखी वाढणार असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.



शैलेश फटांगरे यांनीही यावेळी गावाच्या विकासासाठी पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीही विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेची वाट निवडल्याचे सांगितले. या पक्षप्रवेशामुळे बोटा गटातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात विविध गावांतील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असून आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



कामाची शैलीच ठरतेय शिवसेनेतील प्रवेशाचे कारण


आमदार अमोल खताळ हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले लोकप्रतिनिधी असल्याने तळागाळातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. मतदारसंघातीलच नव्हे, तर इतर भागातील नागरिकही आपल्या कामासाठी त्यांच्या कार्यालयात येतात आणि प्रामाणिकपणे पाठपुरावा करून अनेकांची कामे मार्गी लागतात, असा अनुभव नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यांच्या कामकाजाची पद्धत आणि विकासाभिमुख भूमिका पाहून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

UPI : आता UPI सशुल्क होणार ? लोकसभेत सादर झालेल्या विधेयकातील तरतुदी समजून घ्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी लोकसभेत एक विधेयक सादर केले. या

SIR Campaign : राज्यात 'एसआयआर' मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच 'एसआयआर' मोहिमेला (SIR Campaign) १७ ऑगस्टपर्यंत

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन