Ind vs Eng : इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात बुमराहने रचला इतिहास ! इंग्लंडमधील सर्वात यशस्वी गोलंदाज

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात (१४ जुलै) रोजी तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमच्या एजबल्टन स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी मालिकेच्या पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करत चाहत्यांना दिलासा दिला आहे. (Ind vs Eng)



भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघात पुनसरागमन करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर बुमराहचा हा पहिला एकदिवसीय सामना होता. तब्बल ९६८ दिवसानंतर बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुमरागमन केले आहे. बुमराहने या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरि ब्रूकला बाद केले आहे.बुमराहने एका उत्कृष्ट चेंडूवर हॅरी ब्रुकला बाद करत आपल्या एकदिवसीय करिअरमधील १५० विकेट्स पूर्ण केले. बुमराह हा सर्वात कमी चेंडूंमध्ये १५० एकदिवसीय विकेट्सचा टप्पा गाठणार तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे, त्याने ही कामगिरी ४,६०५ चेंडूंमध्ये पूर्ण केली आहे. सर्वात कमी चेंडूंमध्ये १५० विकेट्स घेण्याचा भारतीय विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे, ज्याने ही कामगिरी ४,०७० चेंडूंमध्ये केली होती. (Jasprit Bumrah)






इंग्लंमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज


हॅरी ब्रुकला बाद करत बुमराहने इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने रवींद्र जडेजाला मागे टाकेत, इंग्लंडमध्ये ३१ विकेट्स घेतले आहेत.


३१ – जसप्रीत बुमराह
३० – रवींद्र जडेजा
२८ – भुवनेश्वर कुमार

Comments
Add Comment

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५

UP T20 League Rinku Singh : ८-८ ओव्हरच्या सामन्यात रिंकू सिंहचा धुमाकूळ; ४१४.२९ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या २९ धावा!

UP T20 League Rinku Singh : यूपी टी२० लीग २०२६ मध्ये रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. स्पर्धेतील

India vs Sri Lanka 2nd Test : जयस्वाल-फर्नांडोच्या वादानंतर आणखी ड्रामा; विकेट पडताच श्रीलंकन खेळाडूचा संताप, मैदानावर नेमकं काय घडलं?

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळही वाद आणि नाट्यमय

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि

INDvsSL : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीवर भारताची मजबूत पकड

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर

Durand Cup 2026 Final : २२ वर्षांची प्रतीक्षा संपवत ईस्ट बंगाल ठरला चॅम्पियन; मोहन बागानचा ४-१ असा धुव्वा!

कोलकत्ता : भारतीय फुटबॉल वर्तुळातून एक अतिशय रोमांचक आणि मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबो येथील सिंहलीज क्रिकेट