IND vs ENG 1st ODI : अक्षर-वॉशिंग्टनची कमाल! इंग्लंडवर भारताचा दणदणीत विजय; पण शुभमन गिलमुळे वाढलं टेन्शन

बर्मिंगहॅम : भारताने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची विजयी सुरुवात करत पहिल्या सामन्यात ६ विकेट्सने दमदार विजय मिळवला. अष्टपैलू अक्षर पटेलच्या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली. मात्र, या विजयाला शुभमन गिलच्या दुखापतीचं गालबोट लागलं असून दुसऱ्या वनडेसाठी त्याच्या फिटनेसबाबत चिंता वाढली आहे. (IND vs ENG 1st ODI)


टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच विस्कळीत केला. १०७ धावांत ६ फलंदाज बाद झाल्यानंतर जो रूट (७६)* आणि लियाम डॉसन (६८) यांनी १२१ धावांची भागीदारी करत इंग्लंडला २५८ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताकडून अक्षर पटेलने ४ विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीला मोठा धक्का दिला. (IND vs ENG 1st ODI)



२५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिलने ७५ चेंडूत ८० धावांची शानदार खेळी केली. त्याने ११ चौकार आणि १ षटकार लगावत भारताचा डाव सावरला. मात्र, फलंदाजीदरम्यान त्याला क्रॅम्पचा त्रास जाणवू लागल्याने अखेर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. यानंतर भारताची अवस्था १६०/४ अशी झाली होती. अशा वेळी अक्षर पटेल (५७)* आणि वॉशिंग्टन सुंदर (५२)* यांनी नाबाद १०२ धावांची भागीदारी करत भारताला ४५.२ षटकांत विजय मिळवून दिला. (IND vs ENG 1st ODI)



शुभमन गिलच्या फिटनेसची चिंता :


भारताने सामना जिंकला असला तरी शुभमन गिलची (Shubhaman Gill) दुखापत टीम मॅनेजमेंटसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. गिलला यापूर्वीही क्रॅम्प आणि दुखापतीमुळे महत्त्वाचे सामने अर्धवट सोडावे लागले आहेत. त्यामुळे १६ जुलै रोजी कार्डिफ येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेत तो खेळणार का? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (IND vs ENG 1st ODI)



पहिल्या वनडेचा संक्षिप्त स्कोअर :


इंग्लंड : २५८ (४७.५ षटके)
भारत : २६२/४ (४५.२ षटके)



IND vs ENG ODI मालिकेचे उर्वरित वेळापत्रक :


१६ जुलै २०२६ – दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ (सायं. ५:३०)
१९ जुलै २०२६ – तिसरी वनडे, लॉर्ड्स, लंडन (दुपारी ३:३०) (IND vs ENG 1st ODI)

Comments
Add Comment

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५

UP T20 League Rinku Singh : ८-८ ओव्हरच्या सामन्यात रिंकू सिंहचा धुमाकूळ; ४१४.२९ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या २९ धावा!

UP T20 League Rinku Singh : यूपी टी२० लीग २०२६ मध्ये रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. स्पर्धेतील

India vs Sri Lanka 2nd Test : जयस्वाल-फर्नांडोच्या वादानंतर आणखी ड्रामा; विकेट पडताच श्रीलंकन खेळाडूचा संताप, मैदानावर नेमकं काय घडलं?

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळही वाद आणि नाट्यमय

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि

INDvsSL : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीवर भारताची मजबूत पकड

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर

Durand Cup 2026 Final : २२ वर्षांची प्रतीक्षा संपवत ईस्ट बंगाल ठरला चॅम्पियन; मोहन बागानचा ४-१ असा धुव्वा!

कोलकत्ता : भारतीय फुटबॉल वर्तुळातून एक अतिशय रोमांचक आणि मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबो येथील सिंहलीज क्रिकेट