FIFA World Cup ENG vs ARG : इंग्लंड की अर्जेंटिना? कोण पोहचणार फायनलमध्ये;आकडेवारी काय सांगते ?

जॉर्जिया : फिफा विश्वचषक २०२६ आता शेवटच्या टप्प्यात आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सचा २-० ने पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या सामन्यात डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात १६ जुलै रोजी अटलांटा येथील मर्सिडीज-बेंझ स्टेडियम येथे लढत होणार आहे.उपांत्य फेरीच्या या हाय-व्होल्टेज सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट फायनलमध्ये स्पेनविरुद्ध खेळेल.(ENG vs ARG)




हेड टू हेडमध्ये इंग्लंड आघाडीवर


ऐतिहासिक रेकॉर्ड आणि विजयाची शक्यतादोन्ही संघांच्या ऐतिहासिक कामगिरीवर नजर टाकल्यास, फिफा विश्वचषकाच्या मंचावर इंग्लंडचे पारडे अर्जेंटिनापेक्षा थोडे जड राहिले आहे.इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात यापूर्वी विश्वचषकामध्ये ५ सामने झाले आहेत. यापैकी ३ सामन्यात इंग्लंडने तर २ सामन्यात अर्जेंटिनाला विजय मिळाला आहे. या ऐतिहासिक लढतींमध्ये १९८६ चा तो प्रसिद्ध सामना देखील समाविष्ट आहे, ज्यामध्ये दिएगो मॅराडोनाने हँड ऑफ गॉड गोल केला होता. यामुळे संपूर्ण फुटबॉल विश्वाचे लक्ष्य या सामन्यावर लागले आहे.(FIFA World Cup 2026)



काही फुटबॉल विश्लेषकांच्या अनुसार, या सामन्यात कोणत्याही एका संघ स्पष्ट प्रबळ मानला जात नाही आहे. या सामन्यात इंग्लंडच्या विजयाची शक्यता ३५.१% आणि अर्जेंटिनाच्या विजयाची शक्यता ३१.८% आहे, तर निर्धारित वेळेत (Extra Time) हा सामना ३३.१% ड्रॉ (बरोबरी) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.







या २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांचा फॉर्म अत्यंत उत्कृष्ट राहिला आहे. लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना या विश्वचषकात अपराजित राहिली आहे. संघाने या विश्वचषकात सहापैकी सहा सामने जिंकत आपले वर्चस्व गाजवले आहे.अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा ३-१ असा पराभव केला होता.दुसरीकडे, इंग्लंड संघाने ६ पैकी ५ सामन्यांत विजय मिळवला असून १ सामना ड्रॉ खेळला आहे.त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा २-१ ने पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे.हा सामना दोन्ही संघांतील स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असेल.अर्जेंटिनासाठी ३९ वर्षीय दिग्गज लिओनेल मेसी (६ गोल, २ असिस्ट) आणि लाऊतारो मार्टिनेझ (६ गोल) हे फॉर्मात आहेत. तर इंग्लंडसाठी ज्युड बेलिंगहॅम (६ सामन्यांत ६ गोल) हा या स्पर्धेत ट्रम्प कार्ड ठरला असून, त्याला कर्णधार हॅरी केनच्या प्रदीर्घ अनुभवाची मोठी साथ मिळणार आहे








दोन्ही संघांची संभाव्य ११


इंग्लंड (४-२-३-१):


जॉर्डन पिकफोर्ड , रीस जेम्स , एझरी कोन्सा , मार्क गुहे , निको ओ'रेली , इलियट अँडरसन , डेक्लन राईस , बुकायो साका , ज्युड बेलिंगहॅम , अँथनी गॉर्डन , हॅरी केन


अर्जेंटिना (४-१-२-१-२):


एमिलियानो मार्टिनेझ ; नहुएल मोलिना , क्रिस्टियन रोमेरो , लिसांड्रो मार्टिनेझ , निकोलस टॅगलियाफिको ; लिएंड्रो परेडेस , रॉड्रिगो डी पॉल , एन्झो फर्नांडीझ , ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टर ; लिओनेल मेस्सी , ज्युलियन अल्वारेझ.

Comments
Add Comment

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन

Asian Games : स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तेजस शिर्से आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

चेन्नई : महाराष्ट्राचा अडथळा शर्यतपटू (हर्डलर) आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्से याला 'स्ट्रेस फ्रॅक्चर'च्या

Arshdeep Singh : ‘सॉरी एश भाई...’; टॉप-5 गोलंदाजांची यादी सांगताना अर्शदीपने अश्विनची मागितली माफी, कारण ऐकून चाहत्यांनाही हसू आवरेना!

नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आपल्या दमदार गोलंदाजीसह बिनधास्त

Glasgow Commonwealth Games 2026 : पाकिस्तानी बॉक्सर कुदरतुल्ला हॉटेलमधून बेपत्ता; पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन पुन्हा वादात

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अखेरीस ग्लासगोमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा बॉक्सर

Akhilesh Reddy : मॅच फिक्सिंग प्रकरणात अमेरिकन क्रिकेटपटूला ICCचा दणका! अखिलेश रेड्डीवर तब्बल ८ वर्षांची बंदी

दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कठोर भूमिका घेत असून, आता

India vs Sri Lanka : जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; औकिब नबीला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी

नवी दिल्ली: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी