Nashik Accident : सोमठाणे घाटात प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, २५ जखमी

Nashik Accident : येवला-नांदगाव मार्गावर (Yeola-Nandgaon Highway) भीषण अपघाताची घटना घडली आहे. येवला-नांदगाव मार्गावरील सोमठाणे घाटात आज (मंगळवारी) सकाळी मध्य प्रदेशातील एक खाजगी लक्झरी बस चालकाचे नियंत्रण सुटून उलटल्याने भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेली खाजगी लक्झरी ट्रॅव्हल्स बस मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) असून, ती २५ ते ३० प्रवाशांना घेऊन जात होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बस सोमठाणे जोश घाटातून जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे भरधाव वेगातील ही बस थेट रस्त्यावरच पलटी झाली. अपघात (Accident) होताच बसमधील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.



जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू


अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले असून, त्यापैकी ५ ते ६ गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे (Hospital) नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (Nandgaon Rural Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



भावली येथील घटनेप्रकरणी पोलीस काय म्हणाले ?


दरम्यान , भावली घटनेप्रकरणी  नाशिकचे एस. पी डी. एस स्वामी यांनी याबाबत सांगितले की, भावली धरण येथे जी घटना घडली होती, त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला विनय भंग, गाडीची काच फोडणे,हल्ला करणे, विनय भंग, attempt to murder सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी, नांदगाव सदो, माणिक खांब इतर परिसरात हे आरोपी असून आतापर्यंत 9 आरोपी अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निष्पन्न झाले असून यामधील 1 आरोपी भोईर नामक याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात कडक कलम लाऊन पर्यटनावर परिणाम होणार नाही अशी कडक कारवाई केली आहे.



आरोपींना मदत करणारेही आरोपीच


पुढे ते म्हणाले, की त्यादिवशी वादावादी झाली होती तेथून पुढे 7-8 किलोमिटर पुढे झाली होती. वादाचे कारण एक इसमाने शिट्टी वाजवली होती तिथून ते निघून गेले त्यांनंतर हा वाद आणखी पुढे वाढला. महत्वाचे बंदोबस्त आपण वाढवला आहे, अशी घटना घडणार नाही त्यानुसार खबरदारी घेतली जाईल. व्हिडिओच्या माध्यमातून आणि तांत्रिक विश्लेषणातून या आरोपींना ताब्यात घेतले असून अंबड पोलिस स्टेशन येथे पहिले गुन्हा रजिस्टर झाला त्यानंतर हा गुन्हा इगतपुरी स्टेशनकडे वर्ग झाला. सुरुवातीला फक्त बाचाबाची झाली आणि त्या नंतर पुढे 7-8 किलोमीटर हा वाद वाढला. १ आरोपीचा तपास सुरू आहे तर आणखी काही आरोपींची नाव निष्पन्न झाले आहे त्यांचा तपास सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी या आरोपींना मदत केली त्यांना देखील आपण आरोपी करणार आहोत अशी माहिती नाशिकचे एस. पी डी. एस स्वामी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Comments
Add Comment

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा बांकीपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय

बांकीपूर : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत जन

Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या घटनादुरुस्तीचे पुरावे सादर करा!

- केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र; वैध प्रस्ताव अथवा ठराव अद्याप प्राप्त नाहीत मुंबई :

Akhilesh Reddy : मॅच फिक्सिंग प्रकरणात अमेरिकन क्रिकेटपटूला ICCचा दणका! अखिलेश रेड्डीवर तब्बल ८ वर्षांची बंदी

दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कठोर भूमिका घेत असून, आता

Pune Rain : पुणेकरांनो सावध व्हा! मुठा नदीने धारण केले रौद्ररूप; धरण साखळी पूर्ण भरली, सखल भागात सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम

NDA Mangal Milan : एनडीएची मंगल मिलन बैठक मंगळवार ४ ऑगस्ट रोजी होणार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सोमवार ३ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. निवडक