Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल


बाळापूर : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाडयाच्या घरात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी प्रेमाचे खोटे स्वप्न दाखवून तिला प्रेमाच्या जाळयात ओढलं. संबंधित तरुणीने लग्नाची मागणी केल्या वर पोलीस कर्मचाऱ्याने विवाह करण्यास नकार दिल्याने तिला मानसिक धक्का बसला. या तणावाखाली येऊन तिने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.(Balapur)



मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणीच्या वडिलांनी बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. वडिलांनी सांगितलं की संबंधित कर्मचारी आमच्या घरात भाड्याने राहत होता. पवन वडगावे असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने आधी माझ्यामुलीशी प्रेमाचं खोट  नाटक केल आणि लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर त्याने विवाह करण्यास नकार दिला. या घटनेमुळे ती खूप दिवस मानसिक तणावाखाली होती आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला.(Crime News)



गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी पोलीस कर्मचारी दोन-तीन दिवसांपूर्वी सुटी घेऊन पसार झाला आहे. बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली असून, त्याच्या नातेवाईकांकडे आणि संपर्कातील लोकांकडे कसून चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Mahakumbh Mela 2027 : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ची तयारी वेगात; साधुग्राम व्यवस्था अधिक सक्षम

नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने साधुग्राम आणि

Nashik Crime News : भोंदू खंडागळेला चार दिवसांची पोलिस कोठडी; पीडित महिलेच्या पुनर्वसनासाठी नाशिककर सरसावले

नाशिक : गुजरातच्या वलसाड येथील महिलेला फसवून तिच्याकडून ७७ हजार रुपये उकळल्याप्रकरणी नाशिकच्या फुलेनगर येथील

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

World Vada Pav Day 2026 : मुंबईच्या रस्त्यांपासून जगभरात पोहोचलेला वडापाव; जाणून घ्या या ‘देसी बर्गर’ची खासियत!

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे वडापाव! मुंबईच्या गजबजलेल्या