Train Viral Video : चक्क चालत्या ट्रेनमध्ये पूजा अर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या भारतीय रेल्वेच्या (indian Railway) एका चालत्या डब्यात धार्मिक विधी आणि पूजा केली जात असल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, ट्रेनमध्ये अशा प्रकारे धार्मिक विधी करण्याची परवानगी असते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच 'हनिमून कोच'चा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, आणि त्यानंतर आता हा पूजेचा व्हिडिओ समोर आल्याने सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक पुजारी रेल्वे डब्याच्या जमिनीवर बसून पूजा-अर्चा करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत पांढऱ्या वस्त्रांमधील अनेक भाविकही या पूजेमध्ये सहभागी झाल्याचे व्हिडिओत स्पष्ट होत आहे.






रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण




हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर उत्तर रेल्वेने (Northern Railway) आपल्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेने सांगितले की, हा धार्मिक विधी कोणत्याही सामान्य प्रवासी डब्यात (Regular Passenger Coach) झालेला नाही. हा विधी एका खाजगी व्यक्तीने बुक केलेल्या 'सलोन कार' (Saloon Car) म्हणजेच एका विशेष लक्झरी कोचमध्ये करण्यात आला होता. आयआरसीटीसी (IRCTC) च्या माध्यमातून एका खाजगी पार्टीने हा संपूर्ण कोच बुक केला होता.




काय असतो 'सलोन कार' कोच ?


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 'सलोन कार' हा रेल्वेचा अत्यंत आलिशान आणि खाजगी कोच असतो. साधारणपणे उच्चपदस्थ अधिकारी आणि व्हीआयपी (VIP) व्यक्तींच्या प्रवासासाठी याचा वापर केला जातो. या लक्झरी कोचमध्ये वातानुकूलित (AC) बेडरूम, एक छोटे स्वयंपाकघर (Kitchenette), दिवाणखाना (Living Room), डायनिंग रूम आणि जोडलेली स्वच्छतागृहे यांसारख्या आधुनिक व उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतात.



लाखो रुपयांचे बुकिंग आणि प्रवास


उत्तर रेल्वेने स्पष्ट केले की, हा सलोन कोच आयआरसीटीसी (IRCTC) द्वारे ८ जुलै रोजी बुक करण्यात आला होता. या खाजगी बुकिंगसाठी संबंधित पार्टीने रेल्वेला तब्बल ३ लाख ८ हजार ५८० रुपयांचे (Rs 3,08,580) आगाऊ शुल्क (Advance Payment) व्यावसायिक नियमांनुसार भरले होते. हा विशेष कोच १० जुलै रोजी नवी दिल्ली (NDLS) हून मुंबई (BDTS) कडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२९२६ 'पश्चिम एक्सप्रेस'ला (Paschim Express) जोडण्यात आला होता. हा एकतर्फी (One-way) प्रवास होता आणि या प्रवासादरम्यानच कोचमधील खाजगी जागेत हा धार्मिक विधी पार पडला. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील