Shalarth ID Scam : सध्या राज्यात बनावट शालार्थ आयडी घोटाळा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. बनावट शालार्थ आदेशाच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने महत्त्वाची कारवाई करत धुळे येथील आरोपी प्रशांत तुळशीराम वाडीले याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याच्या गोंदुर रोडवरील वैभव नगर येथील राहत्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर वाडीले याला धुळे न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी नाशिक येथे नेण्यात आले. (Shalarth ID Scam)
Nashik : नाशिकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सुरू असलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत शहरातील सुमारे ४८.५ लाख ...
१६० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकीचा आरोप
बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हा घोटाळा १६० कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला आहे, त्यामुळे घोटाळ्याचे स्वरूप वाढले आहे. माहितीनुसार, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैयक्तिक मान्यता आदेश किंवा शालार्थ प्रस्ताव नसतानाही मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. आणि पुढे याच आधारे या बनावट आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीमध्ये नोंदी करून संबंधितांना वेतन आणि थकबाकीची मोठी रक्कम अदा करण्यात आली. (Shalarth ID Scam)
तपासात संशयित प्रशांत तुळशीराम वाडीले याची भूमिकाही समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील काही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही त्याने मागील तारखेच्या नियुक्त्या दर्शवून बनावट शालार्थ आदेश तयार केल्याचा आरोप आहे. तसेच तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षऱ्या वापरून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणात फरकाची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Shalarth ID Scam)
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीच्या आईने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अस्मिता प्रतीकसिंह ...
१२०० संशयित निष्पन्न
या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक तसेच इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे १२०० संशयित निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आता हे १२०० संशयित पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. (Shalarth ID Scam)
- हर्षित राणाला ग्रेड-१ हॅमस्ट्रिंग दुखापत मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया तीन सामन्यांच्या वनडे ...
अटकेसाठी पथक
संशयित प्रशांत तुळशीराम वाडीलेच्या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी, संदीप बागल यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखा आणि अंबड युनिट-३च्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ दाखल असून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंतर्गत कलम ६६, ६६ (क) व ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.






