Chhaya Kadam : सलग साडेतीन तास एकाच जागी... हलताही येईना! भूतम भयम्' मधील छाया कदम यांच्या 'जठाई' लूकची जोरदार चर्चा!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'भूतम भयम्' या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटाची तुफान हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. केवळ भीतीच नाही, तर पोट धरून हसवणाऱ्या विनोदाचा आणि अंगावर काटा आणणाऱ्या रहस्याचा एक अनोखा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेषतः चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून एकाच नावाची आणि लूकची सर्वत्र चर्चा आहे, ती म्हणजे अभिनेत्री छाया कदम यांनी साकारलेली 'जठाई'! ट्रेलरमधील त्यांच्या एका झलकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.



'जठाई'च्या भयानक लूकमागची मेहनत


चित्रपटात छाया कदम यांनी साकारलेल्या 'जठाई'चे रूप अत्यंत भयावह आणि अंगावर काटा आणणारे आहे. तिचा भयानक चेहरा आणि थेट आरपार जाणारी भेदक नजर पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडेल. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या लूकमध्ये स्वतः छाया कदम यांना ओळखणेही अशक्य झाले आहे. नुकताच या लूकच्या मेकिंगचा एक 'बिहाइंड द सीन्स' (BTS) व्हिडीओ समोर आला आहे. हा अमानवीय आणि भयंकर लूक मिळवण्यासाठी छाया कदम यांना रोज सलग तीन ते साडेतीन तास एकाच जागी स्तब्ध बसून प्रोस्थेटिक मेकअप करावा लागायचा. त्यांच्यासह संपूर्ण मेकअप टीमने घेतलेली ही अपार मेहनत या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते.



"गिब्रिश भाषेचं आव्हान आणि शारीरिक मर्यादा..." - छाया कदम




आपल्या या वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेविषयी बोलताना छाया कदम यांनी आपला अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, "एक कलाकार म्हणून मला नेहमीच चौकटीबाहेरचं काहीतरी करण्याची भूक असते. 'भूतम भयम्' मधील 'जठाई' ही माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वात अनोखी आणि वेगळी व्यक्तिरेखा आहे. जठाईचे दिसणे, तिचे चालणे-बोलणे आणि अगदी हसणे या सर्वच गोष्टींवर मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली." या भूमिकेतील भाषेच्या आव्हानाबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या, "सर्वात कठीण भाग म्हणजे 'जठाई' ही एक 'गिब्रिश' (Gibberish - अर्थहीन किंवा अज्ञानाकलनीय) भाषा बोलते. ही अनोळखी भाषा शिकणे आणि ती नैसर्गिकरीत्या पडद्यावर मांडणे हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. पण दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले."



जड वेशभूषा आणि हालचालींवर बंधने


रोजच्या मेकअपच्या संघर्षाबद्दल सांगताना छाया कदम यांनी स्पष्ट केले की, "प्रोस्थेटिक मेकअप करायला साडेतीन तास लागायचेच, पण शूटिंग संपल्यानंतर तो काढण्यासाठीही तितकाच वेळ जायचा. इतका जड मेकअप आणि तशीच जड वेशभूषा अंगावर वागवत अभिनय करणे शारीरिकदृष्ट्या अत्यंत दमछाक करणारे होते. मेकअपमुळे माझ्या हालचालींवर खूप मर्यादा यायच्या. मात्र, जेव्हा तुम्ही अशी एखादी ताकदीची भूमिका साकारता, तेव्हा मिळणारे समाधान या सर्व त्रासावर मात करते. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना 'जठाई'चे हे रहस्यमय आणि भयानक व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहील."



तगडी स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख


या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे तरुणाईची लाडकी 'ऑरेंज ज्यूस गँग'. इंटरनेटवर धुमाकूळ घालणारे प्रसिद्ध कंटेट क्रिएटर्स करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे यांच्यासोबतच मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर अशी तगडी आणि हास्यकल्लोळ उडवून देणारी स्टारकास्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हॉरर, सस्पेन्स आणि कॉमेडीने खचाखच भरलेला हा बहुचर्चित चित्रपट येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

Friendship Day 2026 Special : मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारे बॉलीवूडचे 'हे' सुपरहिट चित्रपट, एकदा नक्की पाहाच!

मुंबई : मैत्री म्हणजे विश्वास, साथ, त्याग आणि आयुष्यभर जपला जाणारा नात्याचा धागा. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या

Hrithik Roshan : ऑफिससाठी जागा भाड्याने देऊन अभिनेता हृतिक रोशन कमावतो अफाट पैसा

मुंबई : बॉलिवूडचे अनेक कलाकार सिनेसृष्टीतील अस्थिरतेचा विचार करून आर्थिक सुरक्षेसाठी विविध क्षेत्रांमध्ये

Bollywood News : 'सुल्तान'मधून सलमान खानने रिजेक्ट केलेली अभिनेत्री आज गाजवतेय बॉलीवूड; जाणून घ्या त्या अभिनेत्रीच्या संघर्षाबद्दल

मुंबई : कोणत्याही फिल्मी पार्श्वभूमीशिवाय बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री मृणाल

Bollywood Movie : मिर्झापूर द मूव्हीच्या हाय-एनर्जी रॅप गाण्यात दिसणार का ढांडा न्योलीवाला?

टीझरला मिळालेल्या प्रचंड आणि जबरदस्त प्रतिसादानंतर आता "मिर्झापूर द मूव्ही" हा चित्रपट(Movie) ११ ऑगस्ट रोजी आपल्या

Friendship Day : मैत्री दिनानिमित्त विशेष; ५ सोपे प्रश्न सांगतील तुमच्या 'खऱ्या' मित्राची ओळख!

फ्रेंडशिप डे आला की सोशल मीडियावर शुभेच्छांच्या मेसेजेस चा वर्षाव होतो. मात्र, या डिजिटल जगात तुमचा असा कोणता

Multiplex : स्पायडरमॅन सिनेमावर कुशल बद्रिके नाराज ; नक्की कारण काय ?

उत्तम कलाकृतींना नेहमीच अमाप प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.