Mumbai news : धक्कादायक! अंधेरीत तलावात पोहताना १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; शोधमोहीमेदरम्यान सापडला मृतदेह

तलावात मित्रांसोबत पोहायला गेला अन् परतलाच नाही; १० वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू


मुंबई : मुंबईतील (Mumbai) अंधेरी (पश्चिम) (Andheri West) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येक आहे. एका तलावात पोहताना १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. ही घटना डी.एन. नगर येथील जागृत हनुमान मंदिरामागील वायरलेस कंपाऊंड परिसरातील खासगी मालकीच्या तलावात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास, जवळच्या झोपडपट्टीतील दोन ते तीन मुले तलावात पोहण्यासाठी गेली होती. तलावात पोहताना एका मुलाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बूडू लागला. या घटनेची बाब लक्षात येताच, रहिवाश्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.  ( Child Drowning)



घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस(Police) आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. मुलाला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते.


मुंबई अग्निशमन दलाकडून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहिमनेदरम्यान मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या मुलाची ओळख दिनेश बसवराज हरिजन (वय १०) अशी पटली आहे. दिनेश आपल्या मित्रांसोबत तलाबात पोहण्यासाठी आला होता. तेवढ्यात ही दुर्घटना घडली.



या घटनेनंतर संबंधित परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर जाऊ शकेल अशी लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६