Nanded Crime : प्रेमाच्या नादात युवकाची चाकूने भोसकून हत्या

नांदेड : नांदेड शहरामध्ये शनिवारी (११जुलै) मध्यरात्री एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सचिन यशवंत काळे (वय २४) या युवकावर धारधार चाकूचे वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, मुख्य संशयित आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले आहे. प्रेमसंबंधाच्या वादातूनच हा खून झाला असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे.



प्राथमिक माहिती नुसार, आरोपी राजेश राजेगोरे याचे सचिन काळे याच्या पुतणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला सचिन काळे याचा तीव्र विरोध होता. या कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद सुरु असायचा. याच वादाचा शेवट करण्यासाठी राजेश राजेगोरे याने आपल्या मित्रांच्या मदतीने सचिनची हत्या करण्याचा कट रचला.



शनिवारी मध्यरात्री सचिन काळे(Sachin Kale) हा नेहमी प्रमाणे कामावरून घरी जात असतांना आसना पूल परिसरात आरोपींनी त्याला रस्त्यात गाठले. जुन्या भांडण उखरून आरोपींनी सचिनवर धारदार चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता कि सचिन गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीचं त्याचा तडफडून मृत्यू झाला. या भयंकर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुगणालयात दाखल केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मुख्य आरोपी राजेश राजेगोरे याच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या.


या प्रकरणात चौथा आरोपी फरार आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. रस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Jamkhed : नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र बॉम्बने उडविण्याची धमकी; डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

जामखेड : नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत एका व्यक्तीने शिवीगाळ

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

Shravan Putrada Ekadashi 2026 : श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम