Mumbai-Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प; प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली, अतिरिक्त शिवनेरी बसेस सुरू

मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Mumbai-Pune Railway)


प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) पुढाकार घेतला आहे. मुंबई-पुणे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त एसटी बसेस आणि शिवनेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai-Pune Railway)



१७ जुलैपर्यंत ३० रेल्वे गाड्या रद्द :


मध्य रेल्वेने सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सुमारे ३० महत्त्वाच्या रेल्वे गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू असून, सेवा सुरळीत होईपर्यंत प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यावर भर दिला आहे. (Mumbai-Pune Railway)



शिवनेरी सेवांना वाढती मागणी :


सध्या एमएसआरटीसीकडून मुंबई-पुणे मार्गावर दररोज ३६ शिवनेरी बस सेवा चालवल्या जात आहेत. या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक बसमध्ये सरासरी ५० टक्के प्रवासी संख्या नोंदवली जात आहे. मुंबई-पुणे शिवनेरी बसचे तिकीट भाडे ५१० रुपये असून, आरामदायी आणि वेळेवर प्रवासासाठी अनेक प्रवासी या सेवेला पसंती देत आहेत. (Mumbai-Pune Railway)



वीकेंडच्या पार्श्वभूमीवर बस फेऱ्या वाढवल्या :


सोमवार ते गुरुवारदरम्यान बस प्रवाशांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, शुक्रवारपासून शनिवार-रविवारच्या प्रवासासाठी बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. (Mumbai-Pune Railway)



मागणीनुसार आणखी विशेष सेवा सुरू करणार :


एमएसआरटीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या मागणीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. गरज भासल्यास मुंबई-पुणे मार्गावर आणखी विशेष बस सेवा सुरू करण्यात येतील. दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेल्या रेल्वे प्रवासाला आता एसटीचा आधार मिळणार असून, रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत प्रवाशांसाठी ही पर्यायी व्यवस्था मोठा दिलासा ठरणार आहे. (Mumbai-Pune Railway)

Comments
Add Comment

'Dhamaal 4' Movie : 'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; विकेंडला ६० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर 'धमाल 4' (Dhamaal 4) बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट (Hit) ठरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. दुसऱ्या

BMC : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच रात्री पावणेतीन वाजेपर्यंत चालली सभा; तब्बल ११ तास चालवले सभागृह

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण आता नगरसेवकांच्या चिंतेचे कारण ठरताना दिसत असून

Taj Hotel Bomb Threat : 'ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला' म्हणत मध्यरात्री धमकीचा फोन; दाऊदचे नाव घेत खळबळ, पोलिसांची धावपळ, तपासात काय निष्पन्न झाले?

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि अतिसंवेदनशील ताज महाल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने

BMC News : महापालिका स्थायी समिती अध्यक्षांनी विरोधकांच्या आरोपांचा असा घेतला समाचार, म्हणाले..

मुंबई : महापौरांच्या (Mayor) पाठिशी अवघ्या सभागृहाने राहायला हवे, तिथे आपण महापौरांचा राजीनामा मागता? महापालिका

Vidyavihar Flyover Opens : विद्याविहार येथील उड्डाणपूल पुढील महिन्यात होणार खुला

मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाच्या दोन्ही आर्मचे काम येत्या ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण होणार मुंबई :

BMC Tree Planting : दहा बाधित झाडांच्या बदल्यात महापालिका लावणार २३७ झाडे

-सचिन धानजी मुलुंडमधील स्कायवॉकच्या बांधकामात १० झाडे बाधित झाडे लावण्यास मुंबईत जागा नसल्याने वनविभागाकडे