Sunday, July 12, 2026

Beed Crime : किरकोळ वादा टोकाला गेला; तरुणाची चाकूने हत्या, मित्र गंभीर जखमी

Beed Crime : किरकोळ वादा टोकाला गेला; तरुणाची चाकूने हत्या, मित्र गंभीर जखमी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील घाटनांदूर येथे मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार (Attack) करून खून करण्यात आला. या घटनेत त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Beed Crime)

मृत तरुणाची ओळख ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१) अशी झाली आहे. तो लातूरजवळील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री तो दोन मित्रांसह मोटारसायकलवरून घाटनांदूरकडे जात असताना साठे चौक परिसरात काही व्यक्तींशी किरकोळ कारणावरून वाद झाला. (Murder)

वाद वाढल्यानंतर संशयितांनी धारदार चाकूने ज्ञानेश्वरवर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा त्याचा एक मित्रही या हल्ल्यात जखमी झाला. दुसरा मित्र घटनास्थळावरून सुरक्षित पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. (Beed Police)

जखमी तरुणाला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा नोंदवून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचा संशय असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >