Parth Pawar : पवार कुटुंबात पुन्हा वाजणार सनई चौघडे! पार्थ पवार लवकरच अडकणार विवाहबंधनात

मुंबई : पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा लगीनघाई सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार (Parth Pawar) आणि कायनात धार (Kayanat Dhar) यांचा साखरपुडा येत्या २९ जुलै रोजी पुण्यात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सोहळ्यामुळे राजकीय वर्तुळासह सामाजिक क्षेत्रातही चर्चांना उधाण आले आहे.


नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह सोहळा मुंबईत थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यात पार्थ पवार (Parth Pawar) आणि कायनात धार (Kayanat Dhar) यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. रेवती सुळे यांच्या लग्नात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार आणि कायनात धार यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला होता. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. आता साखरपुड्याच्या बातमीने या चर्चांना अधिकृत वळण मिळाले आहे.



कायनात धार यांची पवार कुटुंबाशी जवळीक :


कायनात धार (Kayanat Dhar) या यापूर्वीही पवार कुटुंबातील अनेक कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात दर्शन घेतले होते. त्यांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतरही कायनात धार पवार कुटुंबाच्या दुःखाच्या काळात त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच मुंबईतील वरळी येथे झालेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही त्यांची उपस्थिती होती. (Parth Pawar)



कोण आहेत कायनात धार ?


कायनात धार (Kayanat Dhar) या मूळच्या हरियाणाच्या असून सध्या दिल्लीत वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही काळापासून त्या पार्थ पवार यांच्यासोबत विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. पवार कुटुंबाशी त्यांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पार्थ पवार (Parth Pawar)आणि कायनात धार यांच्या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,