UP firozabad Crime : आईने लग्नास नकार दिल्याचा संताप; १८ महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, अवघ्या ४० दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा

फिरोजाबाद : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील १८ महिन्यांच्या चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपी विराज उर्फ जितेंद्र पाठक (वय २८) याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा गुन्हा 'दुर्मीळातील दुर्मीळ' स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने हत्येनंतर अवघ्या ४० दिवसांत निकाल देत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. (UP firozabad Crime)



सीसीटीव्ही फुटेज ठरले निर्णायक :


या प्रकरणात सोशल मीडियावर व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेज न्यायालयातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरले. गुरुवारी आरोपीला दोषी ठरवल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीने गुन्हा कसा केला हे न्यायालयासमोर सिद्ध केले. (UP firozabad Crime)



लग्नाला नकार; निरागस मुलावर काढला संताप :


पोलिसांच्या माहितीनुसार, २४ वर्षीय रती शर्मा हिने आरोपीचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता. तिला आधीच १८ महिन्यांचा मुलगा असून त्याला सोडून जाणार नसल्याचे तिने स्पष्ट सांगितले होते. याच रागातून आरोपीने त्या चिमुकल्यालाच आपल्या नात्यातील अडथळा मानत त्याचा जीव घेण्याचा कट रचला. (UP firozabad Crime)



चॉकलेटचे आमिष दाखवून केला अमानुष खून :


मे ३० रोजी आरोपीने चिमुकल्याला चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवत घराबाहेर नेले. त्यानंतर अवघ्या ५० मीटर अंतरावरील निर्जन ठिकाणी त्याला वारंवार जमिनीवर आपटून त्याची निर्घृण हत्या केली. सुरुवातीला हा आवाज परिसरातील नागरिकांना सिमेंटच्या गोण्या फेकल्यासारखा वाटला. मात्र, एका स्थानिक रहिवाशाने सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार पाहताच घटनास्थळी धाव घेतली. (UP firozabad Crime)


यानंतर आरोपीने जखमी अवस्थेतील मुलाला पुन्हा घराजवळ आणून तो पडल्याचा बनाव केला आणि घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळाने कुटुंबीयांना मुलगा गंभीर अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, मात्र उपचारापूर्वीच चिमुकल्याचा मृत्यू झाला.



सहा दिवसांत आरोपपत्र, ४० दिवसांत शिक्षा :


या प्रकरणात पोलिसांनी उल्लेखनीय वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या सहा दिवसांत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर जलदगतीने सुनावणी पार पडली आणि केवळ ४० दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.


मृत चिमुकल्याची आजी आणि फिर्यादी अनुसुईया शर्मा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. "जोपर्यंत या शिक्षेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील," असे त्यांनी सांगितले. तसेच, जलद तपास करून न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे. (UP firozabad Crime)

Comments
Add Comment

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावरील L&T फाट्यावर कंटेनर पलटी, वाहतुकीवर परिणाम

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावर (Sinnar-Nashik Highway) एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी असलेल्या L&T फाटा येथे आज भलामोठा कंटेनर वळण घेत

Nashik : अवघ्या काही तासांत पिंपळगाव कडवा कॅनलजवळ पुन्हा दुसरा अपघात; सिन्नर तालुक्यात खळबळ

Nashik : सिन्नर तालुक्यातील पांचाळे–सोमठाणे रस्त्यावरील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे ६ वाजता भीषण अपघात

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Pizza company gets fine : १० इंचाच्या ऐवजी मिळाला ७ इंचाचा पिझ्झा; ग्राहक आयोगाचा दणका, कंपनीला भरावा लागला मोठा दंड!

आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आह

Nashik : सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर