Friday, July 10, 2026

Pakistani Gangster : एटीएसने विदर्भातून दहा जणांना घेतले ताब्यात, पाकिस्तानी गँगस्टरशी सोशल मिडीयावर संपर्काचा संशय

Pakistani Gangster : एटीएसने विदर्भातून दहा जणांना घेतले ताब्यात, पाकिस्तानी गँगस्टरशी सोशल मिडीयावर संपर्काचा संशय

नागपूर : महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज, शुक्रवारी राज्यभर केलेल्या कारवाईंतर्गत विदर्भातून 10 संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात नागपुरातून 4, चंद्रपूर येथून 3 आणि गडचिरोली, गोंदिंया व वर्धा येथून प्रत्येकी एक असे एकूण 10 जणांचा समावेश आहे. कुख्यात पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आलीय.(ATS)

कारवाईदरम्यान एटीएसने संशयितांचे मोबाईल फोन जप्त केले असून, त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवरील चॅट, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारचे निर्देश देण्यात आले होते का, तसेच संबंधित व्यक्तींशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करण्यात आला होता का, याचा तपास यंत्रणा सखोलपणे करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या काही व्यक्तींना शहजाद भट्टीच्या टोळीमार्फत काही महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्यास सांगितल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मात्र, या संदर्भातील अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आणि तपास सुरू आहे.दरम्यान, सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या कोणत्याही संशयिताविरुद्ध अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्व बाबींची कसून चौकशी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.(Pakisthani Gangstar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >