Nashik : पैश्यांची हाव संपेना ! पोलीस अंमलदार ९० हजारांची लाच घेताना जेरबंद

Nashik : पोलिसांना जनतेचे रक्षक समजेल जाते, मात्र हेच रक्षक जर भक्षक झाले तर... नाशिकच्या पेठ पोलीस ठाण्यातील असाच रक्षक लाचेच्या हव्यासासाठी भक्षक झाल्याचं पहायला मिळालं आहे. अवैधरित्या सुरू असलेल्या गुटखा आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या सुरळीत चालू देणे आणि या संदर्भात गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करीत ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पेठ पोलीस ठाण्यातील (Peth Police Station) पोलीस अंमलदार मनोज दगू गायकवाड (३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रंगेहात पकडले. धक्कादायक म्हणजे, संशयित पोलीस कर्मचाऱ्याने खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत यापूर्वी देखील तक्रारदाराकडून ६० हजार रुपये उकळले होते.



नेमकं प्रकरण काय ?


माहितीनुसार, तक्रारदार हा गुजरात राज्यात चिकन विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे आपल्या चारचाकी वाहनातून कोंबड्यांची वाहतूक ते करतात. तक्रारदार नेहमीप्रमाणे गेल्या जून महिन्यात व्यवसायासाठी कोंबड्या घेऊन गुजरातकडे निघाले यावेळी वांगळी परिसरात पेठ पोलीस ठाण्याचे अंमलदार मनोज गायकवाड (Manoj Gaikwad) यांनी त्यांचे वाहन अडवले.


तू गुटख्याची तस्करी करतो, तुझ्याविरोधात मी गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. तक्रारदाराने आपण असा कुठलाही व्यवसाय करत नाही, आपले गुजरातमध्ये (Gujarat) चिकनचे दुकान असून नियमित येणे-जाणे असते, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अंमलदार गायकवाड यांनी तक्रारदाराचे काहीही ऐकून घेतले नाही. तू प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करतो तसेच चिकन वाहतूक करणाऱ्या गाड्याही अवैधरित्या चालवतोस, असे सांगत घाबरवले. गुन्हा दाखल करायचा नसेल तर मला पैसे द्यावे लागतील अशी धमकी दिली.



यापूर्वीही ६० हजार रुपये घेतले


तुझ्या कुटुंबीयांचे पेठ तालुक्यात चांगले नाव आहे. तुझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यांचीही इज्जत जाईल, असे सांगून त्याला पैसे देण्यास भाग पडले. त्यावेळेस त्याच्याकडून ६० हजार रुपये घेतल्याचा आरोप तक्ररीत आहे. या घटनाक्रमानंतर ५ जुलै २०२६ रोजी पेठ पोलीस ठाण्यातील अंमलदार मनोज गायकवाड यांनी तक्रारदाराला पुन्हा फोन केला. अवैधरित्या सुरू असलेल्या गुटखा व कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या सुरळीत चालू देणे आणि गुन्हा दाखल न करण्याबाबत बोलणी करण्यासाठी पेठ येथील तोंडवळ फाटा येथे बोलावले. यावेळी एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली.



लाचलुचपत पथकाकडून रंगेहात ताब्यात


लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यावेळी संशयित पोलीस अंमलदार मनोज गायकवाड यांनी एक लाख रुपयांची मागणी करीत तडजोडीअंती ९० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. १० जुलै रोजी नाशिक शहरातील पेठ रस्त्यावरील एका चहाच्या दुकानात तक्रारदाराकडून ९० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पोलीस अंमलदार मनोज गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Comments
Add Comment

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्‍थानक ते वरळी प्रॉमेनेडला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग प्रस्ताव मंजूर

मुंबईकरांच्या सोयीसाठी सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा मार्ग मुंबईच्‍या पर्यटनाला मिळणार मोठी

BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी मुंबई

Vaccinated Stray Dogs : क्यु आर कोड पहा आणि आपला कुत्रा ओळखा

लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात प्रचंड उलटफेर! आज तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की ऊन पडणार? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप