Nashik : १४ वर्षांनंतर नाशिकला राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद, महाराष्ट्र राज्य वयोगट जलतरण स्पर्धा १८ ते २० जुलै

Nashik : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना (Maharashtra State Swimming Association) आणि नाशिक जिल्हा जलतरण संघटना (Nashik District Swimming Association) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य वयोगट जलतरण स्पर्धेचे आयोजन १८ ते २० जुलैदरम्यान नाशिक रोड येथील जिजामाता आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे करण्यात आले आहे.



जिल्ह्याला राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाची संधी


महत्त्वाचे म्हणजे मागील १४ वर्षांनंतर प्रथमच नाशिक जिल्ह्याला या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांतील ११ ते १७ वयोगटातील सुमारे ६०० ते ७०० खेळाडू सहभागी होणार असून, चार विविध वयोगटांतील मुले-मुलींसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित जलतरणपटूंचाही सहभाग असणार आहे. स्पर्धेला १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता प्रारंभ होईल.



स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर होणार


स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर करण्यात येणार असून, इलेक्ट्रॉनिक टचपॅड व एलईडी स्क्रीनद्वारे निकाल प्रदर्शित केले जाणार आहेत. अंतिम फेरीत निवड झालेले ज्युनिअर गटातील खेळाडू भुवनेश्वर, तर सब-ज्युनिअर गटातील खेळाडू जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील.


सर्व खेळाडूंची उपस्थिती नोंदणी १७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता स्पर्धास्थळी होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर तसेच घनश्याम कुंवर(Ghanshyam Kunwar) यांनी दिली. १४ वर्षांनंतर नाशिकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्याचा अभिमान असल्याची भावना महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे (Maharashtra State Swimming Association) अध्यक्ष विश्वकर्मा शार्दुल (Vishwakarma Shardul) यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,