Nashik Crime : गरम तव्याने चटके अन..., लुडोमध्ये हरल्यानंतर आईच मुलांसोबत संतापजनक कृत्य

Nashik Crime : नाशिकच्या पंचवटी परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जन्मदाती आईच मुलांच्या जीवावर उठल्याच नाशिकमधील एका घटनेनं समोर आलं आहे. पंचवटी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध आणि तिच्या लिव्ह-इन पार्टनरविरुद्ध गेल्या वर्षभरापासून तिच्या १२ आणि ९ वर्षीय दोन मुलांचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


याप्रकरणात मुलांच्या आजीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार असलेल्या मुलांच्या आजीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिची मुलगी पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून तीन वर्षांपूर्वी त्याच्यापासून वेगळी राहू लागली होती. गेल्या वर्षभरापासून ती आपल्या दोन मुलांसह लिव्ह-इन पार्टनरसोबत (Live-in partner) भाड्याच्या घरात राहत होती.



गरम तव्याने चटके अन मारहाण


हा सर्व प्रकार ६ जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजता उघडकीस आला. शाळेचा गणवेश परिधान केलेला १२ वर्षीय नातू रडत-रडत आजीच्या वडापावच्या गाडीवर आला. त्याने स्वतःवर आणि आपल्या ९ वर्षीय भावावर होत असलेल्या अमानुष अत्याचारांची माहिती आजीला दिली. मुलाने सांगितले की, त्याची आई आणि तिचा साथीदार त्यांना प्लास्टिकच्या पाईपने व पट्ट्याने मारहाण करत, उलटे टांगत तसेच गरम तव्याने चटके देत होते. आजीने मुलाची पाहणी केली असता त्याच्या हातांवर गंभीर भाजल्याच्या खुणा आढळून आल्या. (Nashik Crime News )



लुडोमध्ये हरल्यानंतर मुलांना मारहाण


धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिला आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर वारंवार लूडो खेळत असत. त्या खेळात पराभव झाल्यानंतरचा राग ते या दोन निष्पाप मुलांवर काढत त्यांना बेदम मारहाण करत असल्याचेही मुलाने सांगितले. नातवाने सांगितलेला प्रकार आणि त्याच्या शरीरावरील जखमांच्या खुणा पाहिल्यानंतर आजीने त्याला तत्काळ पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchavati Police Station) नेऊन मुलगी आणि तिच्या लिव्ह-इन पार्टनरविरोधात तक्रार दाखल केली.(Nashik Crime News )



संशयित आरोपी फरार


पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत धोकादायक वस्तू किंवा साधनाचा वापर करून दुखापत केल्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिला आणि तिचा साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पंचवटी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून दोघांना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,