Karnataka School poisoning : कर्नाटकमधील शाळेत अन्नातून विषबाधेचा संशय; १५ हून अधिक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल

कलबुर्गी : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या घटनेत १५ हून अधिक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Karnataka School poisoning)


मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी शाळेत दिलेले अन्न खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाला माहिती दिली आणि सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, नेमके विषबाधेचे कारण काय आहे, याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Karnataka School poisoning)



रुग्णालयातील डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.


दरम्यान, या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शाळांमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तपास अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Karnataka School poisoning)




Comments
Add Comment

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड

Kangana Ranaut vs Sharmila Tagore : 'वंदे मातरम' वादावर खासदार कंगना रणौतची शर्मिला टागोर यांच्यावर टीका : "कलेला धर्मात अडकवू नका"

राष्ट्रगीत 'वंदे मातरम'बद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री आणि

Mahadev Betting Scam : महादेव बेटिंग प्रकरणातील सौरभ चंद्राकर मोठे खुलासे करण्यास तयार? भारताकडे मागितले साक्षीदार संरक्षण

Mahadev Betting Scam : महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्क प्रकरणातील कथित सूत्रधार सौरभ चंद्राकर याने या प्रकरणाशी संबंधित

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Ladakh Viral Incident : लडाखमधील वादावर २५ वर्षीय महिलेची माफी; “माझे बोलणे चुकीचे होते, लष्कराचा कायम आदर आहे”

लडाख : लडाखमधील एका रस्ता नाकेबंदी

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला