Nashik : 'मृताचा पुनर्जन्म' करून म्हाडाचं घर हडपलं! २८ वर्षांपूर्वी मृत व्यक्तीला जिवंत दाखवत लाखोंच्या गाळ्यावर डल्ला

Nashik : नाशिकमध्ये एका मृत व्यक्तीने घर घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऐकून तुम्हालांही आश्यर्य वाटलं ना ? नाशिकमध्ये तब्बल २८ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला कागदोपत्री पुन्हा 'जिवंत' करण्यात आलं, त्याचं बनावट मतदान ओळखपत्र (Fake voter ID card) तयार करण्यात आलं, आणि त्याच व्यक्तीच्या नावाने म्हाडाचा निवासी गाळा दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करण्यात आला.


या संपूर्ण कटाचा आता नाशिक शहर गुन्हे शाखेने (Nashik City Crime Branch) पर्दाफाश केला असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आनंद बद्रीनाथ भट्टड आणि राजेश कैलास विश्वकर्मा यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य संशयित प्रशांत श्रीराम बडगुजरसह इतरांचा शोध सुरू आहे.



आर्थिक अडचणींमुळे गाळा मित्राच्या ताब्यात


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर कॉलनीतील म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील (MHADA's housing scheme) गाळा क्रमांक १७८२ हा मूळ मालक रामकिशोर पुत्तूलाल तिवारी यांना १९८५ मध्ये लॉटरीद्वारे मिळाला होता. आर्थिक अडचणींमुळे तिवारी यांनी त्यांचे मित्र मुखत्यारसिंग रामसिंग यांना पैसे भरण्यास सांगून घराचा ताबा दिला होता. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हा गाळा आपल्या मित्राच्या ताब्यात दिला. दरम्यान, २५ मे १९९८ रोजी रामकिशोर तिवारी (Ram Kishore Tiwari) यांचे निधन झाले. त्यानंतर अनेक वर्षे हा विषय शांत राहिला.



मृत व्यक्तीला जिवंत दाखवत लाखोंच्या गाळ्यावर डल्ला


मात्र २०१७ मध्ये आरोपींनी एक मोठा कट रचल्याचा आरोप आहे. तिवारी यांच्या निधनानंतर तब्बल १९ वर्षांनी, म्हणजेच २०१७ मध्ये आरोपींनी एक भयंकर कट रचला. रामकिशोर तिवारी हे मरण पावले असल्याचे माहित असतानाही, मुख्य संशयित प्रशांत श्रीराम बडगुजर, आनंद भट्टड आणि राजेश विश्वकर्मा यांनी संगनमत केले. त्यांनी मृत तिवारी यांच्या नावाचे आणि त्यावर एका अज्ञात बनावट व्यक्तीचा फोटो असलेले ‘बनावट मतदान ओळखपत्र’ तयार केले.


त्यानंतर एका बनावट व्यक्तीला थेट सहदुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून तोच रामकिशोर तिवारी असल्याचे भासवण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे गाळ्याचा हस्तांतरण दस्त तयार करून तो प्रशांत बडगुजरच्या नावावर नोंदवण्यात आला. पुढे त्याच दस्तऐवजांच्या आधारे म्हाडा कार्यालयातही गाळा हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे.



असा झाला भांडाफोड


या फसवणुकीचा भांडाफोड एप्रिल २०२३ मध्ये झाला. मूळ मालकाच्या वारसदारांनी गाळ्याच्या कायदेशीर हस्तांतरणासाठी प्रक्रिया सुरू केली असता, संबंधित गाळा आधीच दुसऱ्याच्या नावावर झाल्याचे समोर आले. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि संपूर्ण बनावटगिरी उघडकीस आली. अखेर ५ जून २०२६ रोजी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही संशयित फरार होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर गुन्हे शाखा युनिट-दोनच्या पथकाने ध्रुवनगर परिसरात सापळा रचत आनंद भट्टड आणि राजेश विश्वकर्मा यांना अटक केली. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान