Nashik Crime : 'आनंदग्राम'मध्ये दुसरा आर्थिक घोटाळा; 97.10 लाखांची फसवणूक करून तीन सेल्स मॅनेजर फरार

Nashik Crime : नाशिकच्या पंचवटी (Panchvati) परिसरातील तारवाला नगर येथील 'आनंदग्राम' बांधकाम प्रकल्पात आर्थिक फसवणुकीचे आणखी एक मोठे प्रकरण समोर आले आहे. याच प्रकल्पावर सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या तिघांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शेअर ट्रेडिंग (Share Trading) आणि गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवत त्यांनी तब्बल ९७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच तिन्ही संशयित फरार झाले असून, पंचवटी पोलिस (Panchavati Police) त्यांचा शोध घेत आहेत.


यापूर्वीही या टोळीविरुद्ध अशाच प्रकारच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्यातून कोणताही धडा न घेता श्रीकांत जगन्नाथ गटकळ (३७), प्रितम राजेंद्र दाणी (४१) आणि रामेश्वर दत्तात्रय सोळंके (३७) यांनी पुन्हा नव्याने फसवणुकीचा डाव रचल्याचे तपासात समोर आले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


तक्रारदार चेतन चिंधू शिरसाठ (३२) हे आनंदग्राम प्रकल्पावर काम करतात. संशयित श्रीकांत गटकळ याने शिरसाठ आणि इतर सहकाऱ्यांना फॉरेक्स व शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते ३० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाइन ट्रेडिंग अॅप्स (Online Trading Apps) दाखवत काही गुंतवणूकदारांना २० टक्क्यांपर्यंत परतावाही दिला.


त्यामुळे विश्वास बसलेल्या शिरसाठ आणि इतरांनी मिळून २७ लाख १० हजार रुपये संशयितांच्या खात्यावर वर्ग केले. मात्र, मोठी रक्कम जमा झाल्यानंतर परतावा देणे बंद करण्यात आले आणि त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. या टोळीने केवळ सहकाऱ्यांनाच नव्हे, तर फ्लॅट खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही लक्ष्य केले.



जळगाव येथील ७० वर्षीय विनोद जगन्नाथ पवार यांना सहा महिन्यांत ३० टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. मुलीच्या संमतीने पवार यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्या खात्यातून संशयित रामेश्वर सोळंकेच्या खात्यावर ३० लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर पवार यांचे मेहुणे नितीन नारायण पाटील यांनाही त्याच आमिषाला बळी पाडत त्यांच्याकडून ४० लाख रुपये उकळण्यात आले. (Nashik Crime)


या दुसऱ्या गुन्ह्यात एकूण ९७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीकांत गटकळ, प्रितम दाणी आणि रामेश्वर सोळंके हे तिघेही फरार झाले असून, पंचवटी पोलिसांची विशेष पथके त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे का, तसेच या टोळीचे इतर सहकारी आहेत का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान