Malegaon : बिल मंजुरीसाठी मागितली लाच, कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळयात

Malegaon : सरकारकडून महिन्याला चांगला पगार मिळत असतानाही अनेक सरकारी बाबूंची पैश्यांची हाव काही संपत नाही. संतापजनक म्हणजे ज्या शेतकऱ्याला आधीच अस्मानी संकटांनी सतावून सोडले त्याला त्रास देण्यासाठी काही सरकारी बाबुही आपल्याच आजूबाजूला फिरताय. मालेगाव येथील मृद व जलसंधारण उपविभागातील (Soil and Water Conservation Sub-division) कनिष्ठ लिपिक श्रीकांत पाटील याला ५,००० रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. श्रीकांत पाटील याने शेताच्या सुपीकतेसाठी पाझर तलावातून गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे.



नेमकं प्रकरण काय ?


तक्रारदाराच्या मित्राने आपले शेत सुपीक करण्यासाठी नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील घोरपडी पाझर तलावातून गाळ काढण्याकरिता मालेगाव येथील उपविभागीय मृद व जलसंधारण उपविभागाकडे अर्ज केला होता. तशी त्यांना गाळ काढण्याची रीतसर परवानगी देखील मिळाली. महत्त्वाचे म्हणजे ​या गाळ उपसाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा इंधन खर्च शासनाकडून दिला जातो.


श्रीकांत पाटील यांना फक्त हे बिल मंजूर करायचे होते, त्यासाठी त्यांच्या खिशातून एकही रुपया जाणार नव्हता. मात्र श्रीकांत पाटील यांना याठिकाणी भ्रष्टाचाराची संधी दिसली. पाझर तलावातील गळाप्रमाणे बहुतेक पाटील यांच्याही डोक्यात गाळ साचला असावा बहुतेक त्यामुळेच वाहनांचे डिझेल बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात, या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक श्रीकांत काशिनाथ पाटील (Shrikant Kashinath Patil) (वय ३६, रा. धुळे) याने तक्रारदाराकडे ५,००० रुपयांची लाच मागितली.



असा रचला सापळा


सुजाण नागरिक असल्याने आणि लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Nashik Anti-Corruption Bureau) तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने ८ जुलै २०२६ रोजी मालेगाव येथील संबंधित कार्यालयातच सापळा रचला. तेव्हा पंचांसमक्ष ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना श्रीकांत पाटील याला पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी येथील कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील याला अटक करण्यात आली आहे.



कारवाई करणारे पथक


​ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम आणि समीर शेख यांचा सहभाग होता. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर हे काम करीत आहेत.



तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करा


कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी लोकसेवक लाच मागत असेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक: १०६४ ,​व्हॉट्सॲप क्रमांक: ९९३०९९७७००, दूरध्वनी: ०२५३-२५७५६२८ / २५७८२३० किंवा​वेबसाईट: acbmaharashtra.gov.in येथे संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Gift Ideas For Raksha Bandhan 2026 : आपल्या लाडक्या बहिणींना कमी बजेटमध्ये द्या 'ही' सुंदर आणि खास गिफ्ट्स; चेहऱ्यावर येईल हसू

मुंबई : बहिणी-भावाचं नातं हे प्रेम, मस्ती आणि आयुष्यभराच्या आठवणींनी भरलेलं असतं. बहिणीला गिफ्ट देण्यासाठी

Aus vs Ban Test : डार्विनमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; जॅक वेदरल्ड संघाबाहेर, मॅथ्यू रेनशॉला बोलावले

डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

FIFA Leadership Crisis : फिफाची मोठी कारवाई, सीओओ केविन लार्मर यांना हटवले

नवी दिल्ली : फिफा, या जागतिक नियामक संस्थेने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ), केविन लार्मर यांच्याशी संबंध

Dhule Crime : २० हजारांची लाच घेताना साक्री पंचायत समितीच्या अभियंत्यासह ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

Dhule Crime : शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे उर्वरित अनुदान मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची