Mahanagar Gas Limited : मुंबईत इंडिया पोस्ट आणि महानगर गॅस लिमिटेड यांची भागीदारी

मुंबई : नागरिक-केंद्रित सेवा वितरण अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भारतीय टपाल विभाग महाराष्ट्र परिमंडळ आणि महानगर गॅस लिमिटेड (MGL) यांनी मुंबईत एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मुंबई महानगर क्षेत्रातील एमजीएलच्या 20 लाखांहून अधिक ग्राहकांना तंत्रज्ञानावर आधारित घरगुती गॅस मीटर रीडिंग सेवा वितरणात सहयोगासाठी हा करार करण्यात आला आहे. महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत, मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल केया अरोरा आणि महानगर गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष कृष्णन सेल्वापांडियन यांनी या करारावर स्वाक्षरी केली.



पथदर्शी उपक्रमांतर्गत भारतीय टपाल विभागाच्या विश्वसनीय जाळ्याचा भाग असलेले पोस्टमन आणि पोस्टवुमन डिजिटल ॲप्लिकेशन्स आणि मोबाइल-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून घरगुती गॅस मीटरचे रीडिंग आणि छायाचित्रासह पडताळणी करतील. या उपक्रमामुळे ग्राहकांच्या घरातच अचूक, सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने गॅस मीटरचे रीडिंग नोंदवले जाईल. यामुळे ग्राहकांची सोय वाढण्याबरोबरच सेवा अधिक विश्वासार्ह होईल आणि परिचालन क्षमता अधिक बळकट होईल.


भारतीय टपाल विभागाची शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची अतुलनीय क्षमता आणि नागरिकांचा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर असलेला विश्वास याचा लाभ घेत, ही भागीदारी दोन्ही संस्थांच्या क्षमता एकत्र आणून एक अखंड आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवते. या उपक्रमांतर्गत आधुनिक डिजिटल साधनांनी सुसज्ज गणवेशधारी टपाल कर्मचारी, गॅस मीटरचे रीडिंग नोंदवतील, पडताळणीसाठी छायाचित्र पुरावा घेतील आणि ही माहिती एकात्मिक डिजिटल प्रणालीद्वारे सुरक्षितपणे एमजीएलकडे पाठवतील.



या सहयोगातून भारतीय टपाल विभागाची, पारंपरिक टपाल आणि लॉजिस्टिक सेवांच्या पलीकडे जाऊन नवोन्मेषी पर्याय पुरवण्यास सक्षम असलेला एक विश्वासार्ह सेवा भागीदार म्हणून, बदलती भूमिका प्रतिबिंबित होते, असे इंडिया पोस्ट मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल केया अरोरा यांनी यावेळी सांगितले. हा उपक्रम भारतीय टपाल विभागाच्या विस्तृत देशव्यापी जाळ्याचा आणि डिजिटल क्षमतांचा उपयोग करून सार्वजनिक उपयुक्तता सेवा अधिक सक्षम करण्याच्या टपाल विभागाच्या वचनबद्धतेला पाठबळ देतो, असे त्यांनी सांगितले.


हा पथदर्शी प्रकल्प सुरुवातीला मुंबईतील निवडक भागांमध्ये राबविला जाईल. त्याच्या यशावर आणि कार्यात्मक फलनिष्पत्तीवर त्याचा पुढील विस्तार केला जाऊ शकतो. या सहयोगामुळे मीटर रीडिंगमधील अचूकता वाढण्यास, ग्राहकांना सेवा अनुभूती मिळण्यास आणि लाखो घरांपर्यंत कार्यक्षमतेने सेवा पोहोचवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.



ही भागीदारी भारतीय टपाल विभागाच्या वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. याद्वारे भारतीय टपाल विभाग आपले विशाल जाळे नवोन्मेषी आणि नागरिक-केंद्रित सेवांच्या मंचात रूपांतरित करत आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्र व उपयुक्तता सेवा पुरवणाऱ्या संस्थांना ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने आणि विश्वासार्हतेने पोहोचण्यास साहाय्य पुरवत आहे

Comments
Add Comment

Aus vs Ban Test : डार्विनमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; जॅक वेदरल्ड संघाबाहेर, मॅथ्यू रेनशॉला बोलावले

डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

FIFA Leadership Crisis : फिफाची मोठी कारवाई, सीओओ केविन लार्मर यांना हटवले

नवी दिल्ली : फिफा, या जागतिक नियामक संस्थेने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ), केविन लार्मर यांच्याशी संबंध

Dhule Crime : २० हजारांची लाच घेताना साक्री पंचायत समितीच्या अभियंत्यासह ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

Dhule Crime : शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे उर्वरित अनुदान मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची

Nashik Accident News : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये रस्ते अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) दहाव्या मैलाजवळ