Class 11 admission 2026 : ११ वी अ‍ॅडमिशन चुकलं? विद्यार्थिनींसाठी पुन्हा सुवर्णसंधी; विशेष फेरी-२ची घोषणा

- बुधवार १५ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू होणार


मुंबई : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी विशेष फेरी-२ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या फेरीची प्रक्रिया १० जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थिनींना प्रवेशाची अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही विशेष फेरी राबविण्यात येत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे. (Class 11 admission 2026)


२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विशेष फेरी-२ अंतर्गत १० ते ११ जुलैदरम्यान नवीन विद्यार्थिनींची नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थिनींना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. (Class 11 admission 2026)



या फेरीतील प्रवेश वाटप प्रक्रिया १२ जुलै रोजी राबविण्यात येईल. त्यानंतर १३ जुलै रोजी प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध केली जाणार असून विद्यार्थिनींना त्यांच्या लॉगिनद्वारे वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होईल. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींना १३ ते १४ जुलैदरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. (Class 11 admission 2026)



विशेष फेरी-२ नंतरच्या प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक १४ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये १५ जुलै २०२६ पासून नियमितपणे सुरू होणार आहेत. विद्यार्थिनी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. (Class 11 admission 2026)


 

 
Comments
Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा